खानदेशातील 11 भाविक  मानसरोवर यात्रेत अडकले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

खानदेशातील 11 भाविक 
मानसरोवर यात्रेत अडकले 

खानदेशातील 11 भाविक 
मानसरोवर यात्रेत अडकले 

जळगाव ः कैलास मानसरोवर यात्रेस गेलेले 85 भाविक नेपाळजवळील सिमीकोट येथे अडकून पडले आहेत. नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस, धुके असल्याने नेपाळगंजला जाता येत नसल्याने हे सर्व भाविक सिमीकोटला सुखरूप असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीने दिली. 
कैलास मानसरोवर यात्रेसाठी चौधरी यात्रा कंपनीतर्फे 85 भाविक गेलेले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील सहा, धुळ्यातील 5, नाशिकचे 20 ते 22, पुणे येथील सहा ते सात तर मुंबई येथील आठ प्रवाशांचा समावेश आहे. 
चौधरी यात्रा कंपनीचे समन्वयक प्रशांत अलई यांनी सांगितले की, नेपाळमध्ये जाण्यासाठी नेपाळगंजला जावे लागते. आता सर्व प्रवासी सिमीकोटला (नेपाळ व चीनच्या सिमारेषेजवळ) आहेत. सिमीकोटवरून नेपाळगंजला चार्टर विमानाने जावे लागते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. चार्टर विमानांना उड्डाण घेण्यासाठी वातावरण खराब आहे. यामुळे हे प्रवासी सध्या सिमीकोटलाच सुखरूप आहेत. भाविकांशी संपर्क होत आहे. 
 

Web Title: bhavik