भावली धरणग्रस्तांनी निवारा शेडचे काम पाडले बंद

विजय पगारे 
रविवार, 3 जून 2018

याबाबत वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील वैतरणा रस्त्यावर असणाऱ्या खापरी नदीवर शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेतून वाकी खापरी धरण बांधले असून या धरणाचे काम पूर्ण झाले आहे.अडीच टीएमसी क्षमतेच्या या धरणासाठी कोरपगाव, भावली, वाळविहिर शिंदेवाडी आदी गावे बुडीत क्षेत्रात गेली आहेत.यापैकी भावली या गावाचे पुनर्वसन करताना तसेच घराचा मोबदला देताना भेदभाव केला असल्याचा आरोप विस्थापितांनी केला असून याबाबत या विस्थापितांची गेली काही महिन्यांपासून लढाई चालू आहे.

इगतपुरी : पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी प्रकल्पात येणाऱ्या आणि पंतप्रधान सिंचन योजनेतून पूर्ण झालेल्या इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली बुद्रुक या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न धरण पूर्ण होऊनही प्रलंबित असताना, धरणात पूर्ण पाणीसाठा धरण्याचा शासनाच्या विचाराधीन असून यासाठी बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या घराच्या नागरिकांसाठी तात्पुरते निवारे शेड उभारण्याच्या कामाला  भावलीच्या विस्थापितांनी कडवा विरोध करीत हे काम बंद पाडले.जोपर्यंत योग्य पुनर्वसन होत नाही आणि बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यत निवारा शेड बांधू देणार नाही असा निर्वाणीचा ईशारा या प्रकल्प ग्रस्तांनी यावेळी दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील वैतरणा रस्त्यावर असणाऱ्या खापरी नदीवर शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेतून वाकी खापरी धरण बांधले असून या धरणाचे काम पूर्ण झाले आहे.अडीच टीएमसी क्षमतेच्या या धरणासाठी कोरपगाव, भावली, वाळविहिर शिंदेवाडी आदी गावे बुडीत क्षेत्रात गेली आहेत.यापैकी भावली या गावाचे पुनर्वसन करताना तसेच घराचा मोबदला देताना भेदभाव केला असल्याचा आरोप विस्थापितांनी केला असून याबाबत या विस्थापितांची गेली काही महिन्यांपासून लढाई चालू आहे.

असे असताना शासनाने या धरणात यावर्षी पूर्णपणे पाणीसाठा करण्याचे निश्चित केले असून यासाठी बुडीत क्षेत्रात गेलेल्या घरासाठी सुरक्षित स्थळी तात्पुरते निवारा शेड उभारण्यात येणार होते.यासाठी धरणाचे सहाय्यक अभियंता हरिभाऊ गीते हे कामगारासह धरणावर आले असता विस्थापितांनी या कामाला कडवा विरोध करीत हे काम बंद पाडले.जोपर्यंत घरांचा योग्य मोबदला नाही तोपर्यंत शेडचे काम ही होऊ देणार नाही आणि धरणात पाणी साठा करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत विस्थापितांच्या वतीने संजय शिंदे, भास्कर पाचरने,भगवान पाचरने,संपत काळचिडे, त्र्यंबक खाडे कचरू पाचरने,गणपत काळचिडे यांनी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव व नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.

Web Title: bhavli dam affected people in Igatpuri