पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे 'भिक मांगो'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नुकतेच केंद्रीय जलसंपदा मंत्री यांनी वरखेडी, लोंढे, शेळगाव बॅरेज, सुरवाडे-जामफळ यांना भरघोस निधी दिला. मात्र पाडळसे धरणास एक दमडीही दिली नाही. या पार्श्वभूमीवर या आंदोलनात जनतेकडून दमडी गोळा करून शासनास दिली जाणार आहेत.

अमळनेर - पाडळसे धरण २० वर्षा पासुन अपूर्ण आहे. शासनाला धरणासाठी लागणारा निधी साठी अल्पशा मदत म्हणून पाडळसरे धरण जन आंदोलन समिती तर्फे आज 'भिक मांगो आंदोलन' करण्यात आले.

नुकतेच केंद्रीय जलसंपदा मंत्री यांनी वरखेडी, लोंढे, शेळगाव बॅरेज, सुरवाडे-जामफळ यांना भरघोस निधी दिला. मात्र पाडळसे धरणास एक दमडीही दिली नाही. या पार्श्वभूमीवर या आंदोलनात जनतेकडून दमडी गोळा करून शासनास दिली जाणार आहेत. या आंदोलनात पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रा. सुनील पाटील, प्रशांत भदाणे, सतीश काटे, पी. आर. पाटील, डी एम पाटील, अजय पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, देविदास देसले, सलीम टोपी यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व व्यापारी सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. आंबेडकर चौक, गूळ बाजार, सराफ बाजार, कुंटे रोड, हेडगेवर शॉपिंग, गंगा घाट,लाल बाग शॉपिंग, लुल्ला मार्केट, सुभाष चौक, स्टेट बँक, भागवत रोड, बस स्थानकमार्गे तहसील कार्यालय येथे या आंदोलनाचा समारोप होईल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Bhik Maango by Padlesare Dharan Jan Aagolan Samiti