भुजबळांकडून विरोधकांचा समाचार अन प्रचाराचा श्रीफळही!

yevla
yevla

येवला : ''मांजरपाडा, औद्योगिक वसाहत व इतर माझ्या कामावर फोटोसेशन करू नका, आगामी निवडणुकात विचार करून मतदान करा, हजार-दोन हजार कितीही घ्या पण कामाच्या माणसाला मतदान करा, केंद्र व राज्यात शेतकरी हिताचे सरकार हवे, ''असे अनेक व्यक्तव्य करून येथील माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी प्रथमच विरोधकांचा समाचार घेत जणू प्रचाराचा श्रीफळही वाढविला.

देशमाने येथील विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी भुजबळ स्टाईलमध्ये मनोगत व्यक्त करून राजकीय वातवरण नरमगरम केले आहे. येथे आमदार निधीतून दहा लक्ष रुपयांचे सामजिक सभागृहाचे उद्घाटन तसेच नवसाला पावणाऱ्या सिद्धीविनायक मंदिर बांधकाम, भक्त निवास, परिसर सुशोभिकारीण कामासाठी ८६ लक्ष रुपये मंजूर करून त्याच्या कामाची सुरुवात झाल्याने त्याची ही पाहणी त्यांनी केली. तसेच देशमाने ते मुखेड महालखेडा रस्ता कामाचेही भूमिपूजन करण्यात आले.

सत्तेत व जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हा तालुक्यासह जिल्ह्यात झपाट्याने विविध कामे मार्गी लावली पण सध्याच्या सरकारने वाताहत करून टाकली आहे. सरकारला महागाईला आळा घालता येत नसून आमचे सरकार असताना लोक मूठभर पैसे घेऊन गेली असता पिशविभर बाजार आणायची आणि सध्या मात्र पिशवीभर पैशात मूठभर बाजार येणं मुश्किल झाल्याने जनता बेजार झाली आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडूणुकीत योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन भुजबळांनी केले. नोटबंदीचे दुष्परिणाम, महाराष्ट्रच्या आर्थिक विकासात चार वर्षात झालेली पीछेहाट, दुष्काळ परिस्थितीत सरकारचा हलगर्जीपणा आदी विषय घेऊन भाजप सरकारवर जोरदार टीका केली.   

योगेश गांगुर्डे आणि भारत बोरसे यांनी स्वागत केले. यावेळी प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे, प्रांतिक सदस्य अरुण थोरात, संजय बनकर, मोहन शेलार, अनिता काळे, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, वसंत पवार, साहेबराव मढवई, महेंद्र काळे, सचिन कळमकर, कळमकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com