भुसावळ-देवळाली रेल्वेशटल विलंबाचा कहर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

नाशिक : महिनाभराच्या विश्रांतीनंतर देवळाली-भुसावळ-देवळाली शटल (पॅसेंजर) रेल्वे सुरू झाली असली तरी, प्रवाशांच्या मनस्ताप काही कमी झाला नाही. साडेचार तासांच्या प्रवासासाठी शटलला काल (ता.28) 9 तास लागले. त्यामुळे मध्यरात्रीच्या शटल प्रवासात प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मध्यरेल्वेने महिनाभर शटल बंद ठेवून काय साधले ? असा प्रश्‍न सामान्यांचा आहे. ञ

देवळालीहून रोज पहाटे पाचला निघून देवळाली-भुसावळ शटल सकाळी दहाला भुसावळला पोहोचते. त्यानंतर परतीच्या प्रवासात सायंकाळी सव्वापाचला भुसावळहून निघून मध्यरात्री साडेदहाला देवळालीत पोहोचते. जळगाव व नाशिक जिल्ह्यातील प्रवाशी, मनमाडहून जळगावकडे नोकरी-शिक्षणानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांना ही शटल सोईस्कर आहे. परतीच्या प्रवासात मात्र हमखास ती उशिराने धावते. त्यामुळे नोकरी-शिक्षणानिमित्ताने जा-ये करणाऱ्यांना निम्म्या रात्री निर्जनस्थळी असलेल्या रेल्वेस्थानकांवर उतरावे लागते. काल सायंकाळी सव्वापाचला भुसावळहून सुटणारी शटल 1 तास विलंबाने सुटली. जळगावपासून काही अंतरावरील म्हसावदला 30, गाळणला 30, पिंपरखेड 30 मिनिटे अन्‌ पुढे लासलगावला दीड तास, ओढा येथे 20 मिनिटे अशा रितीने 5 तास विलंबाने ही शटल देवळालीला दाखल झाली. 

मुकी बिचारी कुणीही हाका... 
देवळाली ते भुसावळ यादरम्यान 30 स्थानके आहेत. बहुतांश स्थानके निर्जनस्थळी आहेत. त्यामुळे शिक्षण अथवा रोजगारासह अन्य कारणांनी अशा निर्जन गावातील प्रवाशांची संख्या अधिक असते. शटल विलंबाने जेंव्हा अर्ध्यारात्री मुली-महिलांना स्थानकावर उतरावे लागले, तेंव्हा घरी जायचे कसे? असा यक्षप्रश्‍न अनेकांसमोर उभा राहतो. दुसरीकडे काही प्रवाशांनी लासलगावला स्टेशन प्रबंधक व पोलिसांकडे दिरंगाईबाबत विचारणा केली असता, जलद गाड्या रखडल्या तर, मेमो मिळतात, शटलला उशीर झाला कोणी विरोध करीत नाही अन्‌ समजा केल्यास संबधिताचे छायाचित्र काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खोड मोडली आहे, असे अनोखे समर्थन करण्यात आले. म्हणजेच काय, तर मुकी बिचारी कुणीही हाका... अशी गत शटलच्या प्रवाश्‍यांची होते आहे. 

Web Title: Bhusaval-Deolali railway line breakthrough