भुसावळ विभागात मंगळवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

भुसावळ विभागात मंगळवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भादली दरम्यान, चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी(ता. १८) काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ब्लॉकमुळे मात्र, प्रवाशांसह चाकरमान्या वर्गाचे हाल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ब्लॉक घेण्यात येत असून, गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज (ता. १७) इटारसी-जबलपूर दरम्यान सोनंतलाई व बागरटावा मध्ये डबल लाइन तसेच नॉन इंटरलॉकिंग चे काम सुरु असल्याचे भुसावळ कटनी पॅसेंजर रद्द करण्यात आली होती. तसेच भुसावळ स्थानकाहून सुटणाऱ्या देवळाली शटल, सुरत पॅसेंजर, भुसावळ-बांद्रा खान्देश एक्स्प्रेस या गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. विशेषतः सुरतसह नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्‍या प्रवाशांना अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

भादली दरम्यान काम
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली ते जळगावदरम्यान असलेल्या तिसऱ्‍या लाइनसाठी मंगळवारी (ता. १८) सकाळी ९.१० ते दुपारी १.१० या वेळेत स्टील गर्डर टाकले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने चार तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे अप-डाऊन मार्गावरील एकूण १२ गाड्या प्रभावित होणार आहेत. विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर या गाड्या थांबवल्या जाणार आहेत. 

प्रस्थान मार्गात बदल
गाडी क्रमांक ५९०१४ अप भुसावळ-सुरत पॅसेंजर ही गाडी भुसावळ स्थानकाऐवजी धरणगाव स्थानकाहून रवाना होईल. भुसावळ ते धरणगाव दरम्यान ही गाडी रद्द राहील. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ही गाडी पाळधी ते भुसावळ दरम्यान रद्द झाली असून, पाळधी स्थानकावरून रवाना होईल. तसेच गाडी क्रमांक १९००४ अप भुसावळ- बांद्रा खानदेश एक्सप्रेस देखील पाळधी स्थानकावरून रवाना होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com