'त्या' नर्स सुनेचा भुसावळच्या सरकटे परिवारास अभिमान

'त्या' नर्स सुनेचा भुसावळच्या सरकटे परिवारास अभिमान

भुसावळ : येथील माधुरी देव सरकटे या स्वत: आजारातुन बऱ्या होऊन महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कामावर रुजु झाल्या. आज त्या कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यात मग्न आहे. आपल्या या सुनेचा सरकटे परिवाराला अभिमान आहेच शिवाय शिक्षक असलेले त्यांचे पती देव सरकटे त्यांच्या मदतीसाठी गेले असुन रात्रपाळी असल्यास ते स्वत: स्वैयंपाक करुन त्यांना जेवायला देतात हे विशेष होय.

आज सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातलेला आहे. अत्यंत भयावह असे वातावरण संपूर्ण जगात निर्माण झालेले आहे.  अशा परिस्थितीत संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सफाई कामगार हे प्राणपणाला लावून हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी काम करत आहे. या कार्यात भुसावळच्या माधुरी सरकटे यांचा देखील मोलाचा हातभार लागत आहे,  सध्या त्या नवी मुंबई येथील सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे कोरोना आयसोलेशन वार्ड मध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे.  सकाळ शिप असल्यास सकाळी पाच वाजता उठून स्वयंपाक करून ऐरोली येथून सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे जावे लागते. तर रात्रपाळी असल्यास पती स्वैयंपाक करुन ठेवतात.
 
वर्षभरापूर्वी त्यांची सरळसेवा भरती व्दारे ऐरोली येथे राजमाता जिजाऊ रूग्णालयात स्टाफ नर्स म्हणून नियुक्त झाली. नियुक्तीच्या चार-पाच महिन्यानंतरच पावसाळ्यात पेशंट वाढल्याने इन्फेक्शनचा धोका देखील वाढला होता. ड्युटी करत असताना त्या स्वत: आजारी पडल्या. छाती मध्ये पाणी झाले होते. डॉक्टरांनी  दोन महिन्याची मेडिकल लिव्ह दिली. आजारातून पूर्णपणे बरे होऊन त्यांनी नुकतीच पुन्हा ड्युटी जॉईन केली. ड्युटी जॉईन करून महिनाभर सुद्धा होत नाही तोच त्यांची ड्युटी कोरोना आयसोलेशन वार्ड मध्ये झालेली आहे.
 
मी तिला घेण्यासाठी मुंबईला गेलो होतो. नुकतीच आजारातुन बरी होऊनही तिची काम करण्याची हिंमत मला कौतुकास्पद वाटली. आज मला थोडीतरी तिची सेवा करण्याची संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो. अशी भावना देव सरकटे यांनी व्यक्त केली.

आता पीपीई किट उपलब्ध

अत्यंत सुरक्षित असलेल्या पीपीई किट वाशी येथे कोरोना आयसोलेशन वार्ड मध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत.  अशी माहिती सरकटे यांनी दिली.
जळगाव जळगाव जळगाव 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com