वाघे-मुरळी अन्‌ वाद्य कलावंतांचे 'हे' गाव..जिथे होत नाही निवडणूक

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

ग्राम परिस्थितिकी विकास समिती गावात असून, स्वाती अघाव त्याचे कामकाज पाहतात. तीन गावे मिळून गावात एक गणेशोत्सव साजरा होतो. विशेष म्हणजे, गावात निवडणूक होत नाही. सारे गाव मिळून सरपंच, पोलिसपाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ठरवते.

नाशिक : भुसे (ता. निफाड) हे दीड हजार लोकसंख्येचे गाव. इथले वाघे-मुरळी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. हिरामण जाधव, वाळूबा अघाव, म्हसू गिते, कारभारी जाधव आणि इतर कलावंत जिल्हाभर कार्यक्रम सादर करतात. याखेरीज गावातील कुटुंबांनी वाद्य वाजविण्याची कला पिढ्यान्‌पिढ्या जोपासली आहे. विश्‍वनाथ गायकवाड, दगू घायवटे आणि मंडळ हे जिल्ह्यात कार्यक्रमांना जातात. त्यामुळे गावाची ओळख कलावंतांचे गाव म्हणून अशी आहे. 

जलतृप्ती योजनेतून मिळतात पाच लाख; गावात होत नाही निवडणूक 

ग्राम परिस्थितिकी विकास समिती गावात असून, स्वाती अघाव त्याचे कामकाज पाहतात. तीन गावे मिळून गावात एक गणेशोत्सव साजरा होतो. विशेष म्हणजे, गावात निवडणूक होत नाही. सारे गाव मिळून सरपंच, पोलिसपाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ठरवते. गावातील शाळा डिजिटल असून, लोकवर्गणीमधून शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक दिले आहेत. गावात बॅंक महाराष्ट्र बॅंकेच्या फिरत्या पथकाद्वारे आर्थिक व्यवहार केले जातात. गावात भुसारे आडनावाची कुटुंबे अधिक असल्याने भुसे असे गावाला नाव मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावाजवळच्या नदीशेजारील विहिरीतून पाणी गावात आणले आहे. तसेच गावात 30 हजार लिटरची टाकी असून, पिण्याच्या पाण्यासाठी जलतृप्ती योजना राबविली जाते. थंड आणि स्वच्छ 20 लिटर पाणी पाच रुपयांत दिले जाते. त्यातून वर्षभरात पाच लाखांचे उत्पन्न गावाला मिळते. 
Image may contain: grass, tree, outdoor and nature
नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

सैन्यदलात 15 तरुण दाखल 
मारुती, म्हसोबा, शंकर, विठ्ठल-रुखमाई, श्रीकृष्ण, राम, खंडेराव आणि देवीचे मंदिर गावात आहे. नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीच्या वणी गडावरून ज्योत तरुण गावात आणतात. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हसोबा यात्रोत्सव होतो. गावाला "क' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. कारभारी पोटे हे कीर्तनकार इथले. भजनी मंडळात जयराम डोंगरे, राजेंद्र पोटे, रामनाथ फड, भागुजी अघाव, हरिभाऊ अघाव, वाल्मीक फड यांचा सहभाग असतो. जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत गावात शाळा आहे. गावात व्यायामशाळा, वाचनालय नाही. गावात जुना आड आहे. दवाखाना नसल्याने बाजूच्या गावात रुग्णांना न्यावे लागते. गावातील संजय अघाव दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये सेवेत आहेत. शिवाय 15 तरुण सैन्यदलात भरती झाले आहेत. गावातील पहिला डॉक्‍टर होण्याचा मान सतीश पोटे यांनी मिळविला. 

No photo description available.

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

आम्ही एकीचा संदेश देत असतो.
आमच्या गावात ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिले जाते. तीन गाव मिळून एक गणशोत्सव उपक्रम राबवून आम्ही एकीचा संदेश देत असतो. विकासाची कामे आम्ही हाती घेणार आहोत. - रंजना पोटे, सरपंच

भजने, देवीची गाणी आणि वाद्य वाजविणारे कलावंत जिल्ह्यात कला सादर करतात. गावाजवळ पक्षी अभयारण्य आहे. -गंगाधर अघाव (ग्रामस्थ) 

 

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhuse village of musical artists where no election Nashik Marathi News