भुसावळला क्षुल्लक कारणावरून रेल्वे गॅंगमनचा खून 

भुसावळला क्षुल्लक कारणावरून रेल्वे गॅंगमनचा खून 

भुसावळला क्षुल्लक कारणावरून रेल्वे गॅंगमनचा खून 


भुसावळः रेल्वेत गॅंगमन असलेल्या तरुणावर एका तरुणाने पेपर कटरने गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम ऍण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे (35, गंगारॉम प्लॉट, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी संशयीत आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे (26, जुना सातारा, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ हादरले आहे. 

वरून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे हा जामनेर रोडवरील खान्देश बिअर ऍण्ड बार या हॉटेलमध्ये मद्य प्राशनासाठी बसला असताना तेथे संशयीत आरोपी निलेश ताकदे आला, त्यावेळी त्याने विकास यास पिंटू, असे संबोधले. याचा पिंटूला राग आल्याने त्याने त्यास तुझ्यापेक्षा मी वयाने मोठा आहे, मला एकेरी बोलू नको, सांगितले त्यावेळी निलेशने त्यास सॉरी म्हटले व तो तेथून निघून गेला. काही वेळाने निलेश पुन्हा तेथे आला व त्यानेही एका टेबलावर बसून मद्य प्राशन केले. त्यावेळी पिंटू देखील काऊंटरवरच मद्य प्राशन करीत असताना पुन्हा त्याच्या जवळ आरोपी निलेश आला व त्याने पुन्हा तोच विषय काढला, यावेळी पिंटूने देखील त्यास माफ करीत बार मॅनेजरकडे वळून पेग मागितला तोच आरोपीने आपल्या जवळील पेपर कटरने पिंटूच्या गळ्यावर जोरदार वार केल्याने प्रचंड रक्ताचा सडा पडल्याने पिंटू धारातीर्थी पडला. या घटनेने हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची पळापळ झाली तर आरोपी देखील निसटला,अति रक्तस्त्राव झाल्याने पिंटूचा जागीच मृत्यू झाला. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 
घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय गुळींग, उमाकांत पाटील, माणिक सपकाळे, विकास सातदिवे, नेव्हील बाटली, सुनील जोशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांच्यासह अनेकांनी देखील धाव घेत मृतदेह हलवण्या कामी सहकार्य केले. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com