‘बर्ड फ्लू’पेक्षा मोठे संकट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्यांचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून अंड्यांचे भाव गडगडण्यास सुरवात झाली. त्यामुळे व्यावसायिकांना आतापर्यंत १७० कोटींचा दणका बसला. तसेच, खाद्याचे भाव वाढून दुहेरी कात्रीत सापडलेल्या राज्यातील व्यावसायिकांनी अंडी उत्पादन थांबवत कोंबड्यांची विक्री सुरू केली. ‘लेअर पोल्ट्री’ व्यवसायात २००६च्या ‘बर्ड फ्लू’पेक्षा मोठे संकट कोसळले.

नाशिक - गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्यांचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून अंड्यांचे भाव गडगडण्यास सुरवात झाली. त्यामुळे व्यावसायिकांना आतापर्यंत १७० कोटींचा दणका बसला. तसेच, खाद्याचे भाव वाढून दुहेरी कात्रीत सापडलेल्या राज्यातील व्यावसायिकांनी अंडी उत्पादन थांबवत कोंबड्यांची विक्री सुरू केली. ‘लेअर पोल्ट्री’ व्यवसायात २००६च्या ‘बर्ड फ्लू’पेक्षा मोठे संकट कोसळले.

अंडी उत्पादनाचा तोटा सहा महिन्यांनंतरही थांबत नसताना खाद्यापुरतेही पैसे मिळत नसल्याने सुरू असलेल्या ‘पॅनिक सेलिंग’मुळे अंड्यांचे भाव दररोज तळाला जात आहेत, त्यामुळे कोंबड्या विक्रीला काढण्याची वेळ आली आहे.

आज पुणे आणि नाशिक विभागात अंड्यांवरील कोंबड्यांचा भाव किलोला पन्नास रुपयांपर्यंत ढासळला. तीनशे रुपये खर्च केलेल्या कोंबडीची ७५ रुपयांत शेतकऱ्यांना विक्री करावी लागली. २००६च्या ‘बर्ड फ्लू’नंतर इतकी वाईट स्थिती यापूर्वी कधीही आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigger crisis than bird flu Egg