PHOTOS : गतिरोधकांवर सांडणाऱ्या दाण्यांचा पक्ष्यांना आधार... 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 11 डिसेंबर 2019

गेल्या अनेक वर्षांपासून ज्वारी-बाजरीचे उत्पादन आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कपाशी, मका, कांदा आदी पिकांची लागवड करायला सुरवात केल्यामुळे शेतशिवारातील धान्य पीक मोठ्या प्रमाणावर हद्दपार झाल्याने शेतशिवारात अन्नाच्या शोधात असणारे कावळे, चिमण्या, पशुपक्ष्यांना गावाकडचा रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेला धान्याचा आधार घ्यावा लागतोय.

नाशिक : दिवसेंदिवस कपाशी, मका, कांदापिकाच्या वाढत्या क्षेत्रामुळे माळमाथा परिसरात ज्वारी, बाजरी, पिकांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने सुगीच्या हंगामात अन्नाच्या शोधात असणाऱ्या चिमण्या, कावळे व पक्ष्यांची महामार्गावरील गतिरोधकावर पडणारे धान्य खाण्यासाठी पहाटेपासूनच झुंबड उडत आहे. 

Image may contain: bird

शेतशिवारातील नगदी पिकांमुळे पक्ष्यांची परवड 

परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी धान्यवर्गीय पिके घेतली जात होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ज्वारी-बाजरीचे उत्पादन आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कपाशी, मका, कांदा आदी पिकांची लागवड करायला सुरवात केल्यामुळे शेतशिवारातील धान्य पीक मोठ्या प्रमाणावर हद्दपार झाल्याने शेतशिवारात अन्नाच्या शोधात असणारे कावळे, चिमण्या, पशुपक्ष्यांना गावाकडचा रस्ता किंवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेला धान्याचा आधार घ्यावा लागतो.

Image may contain: bird

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

शेतशिवारातून हद्दपार झालेले पक्ष्यांचे थवे महामार्गालगत दिसताएत

मुंबई-आग्रा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची वाहतूक होत असल्याने महामार्गावर असलेल्या गतिरोधकावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील फाटक्‍या पोत्यातील धान्य मोठ्या प्रमाणात खाली पडते. त्यामुळे पशुपक्ष्यांना खाली पडलेले धान्य खाण्यासाठी उपलब्ध होत असल्याने असे पशुपक्षी महामार्गावरील गतिरोधकाजवळ दिसतात. आजवर अन्नाच्या शोधात भटकंती करत शेतशिवारातून हद्दपार झालेले पक्ष्यांचे थवे महामार्गालगत प्रवाशांना पाहण्यासाठी मिळत आहेत. 

Image may contain: bird and outdoor

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birds eats on the speed breaker of highway Nashik Marathi News