
एरवी अंधश्रद्धेची मुळं खोलवर रुतलेल्या समाजात स्मशानभूमी ही अंत्यविधी व्यतिरिक्त अनेक काळ्या जादूटोण्याचं ठाण असल्याचे अनेक गैरसमज आहेत. मात्र ह्याच अंधश्रद्धेला वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातून हद्दपार करण्याचा हेतू ठेऊन चांदोरी (ता. निफाड) येथील तरुणांनी समशानात वाढदिवस साजरा केल्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सद्सद्विवेक बुद्धी असलेल्या प्रत्येक तरुणांत जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे.
नाशिक : स्मशानभूमी म्हटलं की, भूत-प्रेत-आत्मा अन् काळी जादू.. अशीच काही शब्द पुढे उभे ठाकतात. यातच आपल्या कुण्या माणसाला निरोप द्यायचं म्हटलं की मनातच अपरिहर्ता असल्याचं म्हणत अनेक जण येथे येतात. एरवी अंधश्रद्धेची मुळं खोलवर रुतलेल्या समाजात स्मशानभूमी ही अंत्यविधी व्यतिरिक्त अनेक काळ्या जादूटोण्याचं ठाण असल्याचे अनेक गैरसमज आहेत. मात्र ह्याच अंधश्रद्धेला वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातून हद्दपार करण्याचा हेतू ठेऊन चांदोरी (ता. निफाड) येथील तरुणांनी समशानात वाढदिवस साजरा केल्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सद्सद्विवेक बुद्धी असलेल्या प्रत्येक तरुणांत जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे.
युवकांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज
मध्यरात्रीच्या सुमारास युवकांनी चांदोरी येथील स्मशानभूमीत आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यास सुरु केले. एरवी सन्नाटा असलेल्या या स्मशानात युवकांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकू येत होते. कुठल्याही शक्तीला बोलवण्यासाठी संदीप जाधव,सागर गडाख,बाळा शिंदे,योगेश सोनवणे,अविनाश पोरजे,चंद्रकांत वारघडे,बाळा शिंदे,आकाश गायकवाड, महेश शेटे,सचिन कांबळे,सुभाष फुलारे,आकाश शेटे हे युवक आवाज करत नव्हते तर,आपला मित्र आपत्ती व्यवस्थापन समितीचा सदस्य सोमनाथ कोटमे यास हे युवक २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते.
अंधश्रद्धा दूर होण्याच्या दृष्टीने समाजामध्ये एक चांगला संदेश
या वाढदिवसाबद्दल बोलताना सोमनाथने सांगितले की, माझ्या मित्रांनी स्मशानामध्ये वाढदिवस साजरा करायचे ठरवले. स्मशानाबद्दल समाजामध्ये मोठया प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत त्या दूर होण्याच्या दृष्टीने समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल त्यासाठी स्मशानात वाढदिवसाची कल्पना मला आवडली.माझा वाढदिवस फक्त सेलिब्रेशन नव्हते तर अंधश्रध्दांविरोधात तो एक संदेश होता. समाजात चांगले शिकले सवरलेले लोकही अंधश्रध्दांना खतपाणी घालतात. त्यामुळेच हा वाढदिवस एक सेलिब्रेशन नव्हे तर अंधश्रद्धेविरोधात चळवळ ठरल्याचं शेवटी या तरुणांनी बोलून दाखवलं.