ठाकरे बंधूंच्या सभानंतर भाजपकडून सभेची व्युहरचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

शिवस्मारकाचा "बॅकड्रॉप'
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी भाजपतर्फे सुरु आहे. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक अधोरेखित केले जाणार आहे. शिवस्मारकाचा "बॅकड्रॉप' केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी होत असलेल्या सभेच्यानिमित्ताने पक्षातर्फे शक्तीप्रदर्शन होईल, असे दिसते.

नाशिक - युतीमधील "ब्रेक-अप' अन्‌ तत्पूर्वी नाशिकमधील भाजपने शिवसेनेशी केलेली काडीमोड या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला शिवसैनिकांच्यादृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. तसेच सत्तेतील दोन्ही पक्षांमधील वादाच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिककरांशी संवाद साधणार आहे. ठाकरे बंधूंच्या सभा झाल्यावर भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 18 फेब्रुवारीला सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांची सभा त्यादिवशी सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा यशवंत महाराज पटांगणावर होणार आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची नाशिक रोड आणि पंचवटी भागात, तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा पंचवटी-सिडकोमध्ये घेण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रभागनिहाय सभा घेण्याचे नियोजन राहील, अशी माहिती शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली.

शिवस्मारकाचा "बॅकड्रॉप'
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी भाजपतर्फे सुरु आहे. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक अधोरेखित केले जाणार आहे. शिवस्मारकाचा "बॅकड्रॉप' केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी होत असलेल्या सभेच्यानिमित्ताने पक्षातर्फे शक्तीप्रदर्शन होईल, असे दिसते.

"ध्येयनामा'चे आज प्रकाशन
पालकमंत्री गिरीश महाजन हे आज रात्री उशिरापर्यंत नाशिकमध्ये येत आहेत. उद्या सायंकाळी ते पुन्हा जळगावकडे रवाना होणार आहेत. श्री. महाजन यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपतर्फे महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. 10) ध्येयनामा प्रकाशित केले जाणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास पालकमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. त्यानंतर प्रभागनिहाय ध्येयनाम्याचे प्रकाशन केले जाणार आहे.

Web Title: bjp campaigning in nashik