भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी उमदेवाराच्या पाठिशी; शिवसेनेशी थेट लढत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नाशिक - शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपने अखेर रविवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. शिवाजी सहाणे यांना मत देण्याच्या सूचना मतदारांना दिल्या. परवेझ कोकणी यांना अखेरच्या क्षणी वाऱ्यावर सोडून देण्यात आले. त्यामुळे आता ॲड. सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यात सरळ लढत होईल. भाजपमधील एक मोठा गट या निर्णयानंतरही दराडे यांना मतदान करण्याची शक्यता आहे.

हॉटेल ज्युपिटरमध्ये रात्री उशिरा भाजपचे संघटनमंत्री किशोर काळकर  यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय मतदारांच्या बैठकी घेत भाजपने ॲड. सहाणे यांना पाठिंब्याची भूमिका स्पष्ट केली. युतीधर्म न पाळता शिवसेनेतर्फे कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असल्याने या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत शिवसेनेला धडा शिकविण्याचा निर्धार भाजपतर्फे करण्यात आला. नाशिकमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती राहिली नसल्याच्या दिलेल्या स्पष्टीकरणाचा दाखला भाजपने या वेळी दिला. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महापौर रंजना भानसी, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर आदी बैठकांसाठी उपस्थित होते. दरम्यान, श्री. कोकणी यांनी माघार घेतल्याची माहिती भाजपच्या नेत्यांपर्यंत पोचल्याने बहुतांश चर्चेत कोकणींचा नामोल्लेख टाळला गेला.

ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी, राज ठाकरे आदींचे आशीर्वाद आणि पाच वर्षांतील तयारी, ‘व्हिजन’ यामुळे घटक पक्षांचे मतदार आणि सर्वांच्याच पाठिंब्यामुळे विजय निश्‍चित आहे. 
- ॲड. शिवाजी सहाणे, काँग्रेस-राष्ट्रवादी

शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी लढत आहे. माझ्या विजयासाठी शिवसेनेचे सगळे नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते काही दिवसांपासून जोमाने काम करत आहेत. त्यामुळे विजय निश्‍चित आहे.
- नरेंद्र दराडे, उमेदवार, शिवसेना

Web Title: BJP Congress-NCP candidate Fight directly with Shiv Sena candidate