भाजप नगरसेवकांनी वाचला आयुक्तांपुढे तक्रारींचा पाढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - महापालिकेतील विविध समस्या, तसेच अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा पाढा आज भाजपनगरसेवकांनी नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या भेटी दरम्यान मांडला. तर प्रभाग रचनेत घोळ झाला असून आता नवीन प्रारूप मतदार यादीत देखील गडबड होण्याची शक्‍यता आहे. हा घोळ होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निवेदन भाजपातर्फे आयुक्तांना देण्यात आले. 

जळगाव - महापालिकेतील विविध समस्या, तसेच अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा पाढा आज भाजपनगरसेवकांनी नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या भेटी दरम्यान मांडला. तर प्रभाग रचनेत घोळ झाला असून आता नवीन प्रारूप मतदार यादीत देखील गडबड होण्याची शक्‍यता आहे. हा घोळ होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निवेदन भाजपातर्फे आयुक्तांना देण्यात आले. 

आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज पदभार घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे विरोधी पक्षनेते वामनदादा खडके, गटनेते सुनील माळी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र पाटील, अनिल देशमुख, नगरसेविका ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील आदींनी आयुक्तांना शुभेच्छा दिल्या. भेटी दरम्यान चर्चा करताना भाजप नगरसेवकांनी, गाळे प्रश्‍न, हुडको, घरकुल-मोफत बस सेवेची वसुली तसेच मनपाचे खुले भूखंड ताब्यात घेण्याची, कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेंशन मिळत नसल्याबाबत तक्रारी आयुक्तांपुढे मांडल्या. 

विकासकामे शून्य
साडेचार वर्षांत शहरात शून्य विकास कामे झालेले आहे. घरकुल, बससेवा आदी योजनांच्या घोटाळ्यांमुळे ‘मनपा’वर कर्जाचा बोजा चढत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून मनपाचे हिताचे प्रश्‍न राजकीय दबावामुळे आतापर्यंत सुटले नाही. 

दबावात न येता प्रश्‍न सोडा 
महापालिकेत आता पर्यंत राजकीय दबावातून मनपाच्या हिताचे प्रश्‍न प्रलंबित आहे. ते राजकीय दबावात न येता मार्गी लावावे असे नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले. यावर आयुक्त म्हणाले, याचसाठी माझी नियुक्ती शासनाने केली आहे, सर्व प्रश्‍न मार्गी लावू. 

घरकुल, मोफत बससेवेमुळे कर्जाचा डोंगर 
महापालिकेवर कर्जाचा डोंगर हा घरकुल व मोफत बससेवा मुळे झाला आहे. आजी-माजी नगरसेवकांकडून घोटाळ्यातील रक्कमेची वसुली अद्याप झालेली नाही. मनपा मालकीचे ३९६ खुले भूखंड दिले असून तिथे व्यवसाय व गैरवापर होत असून मनपाचे नुकसान होत आहे अशी तक्रार यावेळी केली.

जखम मोठी, म्हणून सर्जनची नियुक्ती
भाजप नगरसेवकांनी आयुक्त डांगेपुढे अनेक समस्या तसेच प्रलंबित प्रश्‍नांची यादी वाचून दाखविली. यावेळी आयुक्त डांगे नगरसेवकांना म्हणाले, की महापालिकेची ही जखम मोठी आहे, याची दुरुस्ती करण्यासाठी सर्जनची नियुक्ती केली असल्याचे सूचक विधान यावेळी केले. 

Web Title: BJP corporator commissioner complaint