Vidhan Sabha 2019 : अशी आहे नाशिकमधील भाजप निवडणुक व्यवस्थापन समिती 

bjp logo 2.jpg
bjp logo 2.jpg

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष गिरीष पालवे होते. यावेळी आमदार सीमा हिरे, प्रा. सुहास फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, सतिश कुलकर्णी, व्दारका मंडल अध्यक्ष सुरेश मानकर आदी उपस्थित होते. 

अशी आहे भाजपाची निवडणुक व्यवस्थापन समिती 

निवडणुक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदी शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रचार व प्रसिध्दी समिती संयोजक गोविंद बोरसे, तुषार जोशी, विपक्ष आरोप खंडन-मंडन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांची नियुक्ती करण्यात आली. जाहीर सभा व दौरा प्रमुख पदावर पवन भगुरकर, वाहन समिती प्रमुख विपुल मेहता, निवास प्रमुख आशिष नहार, विधानसभा संयोजकामध्ये पुर्व विधानसभा मतदारसंघात प्रकाश घुगे व उत्तम उगले, मध्य विधानसभा मतदारसंघात पवन भगुरकर, पश्‍चिम मध्ये जगन पाटील, वर्गवार संमेलन प्रमुख म्हणून अविनाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विधी समिती प्रमुख पदी ऍड. शाम बडोदे, बुथ समन्वय समिती मध्ये उत्तम उगले, सुनिल देसाई,प्रकाश चकोर आदींच्या नावांची घोषणा करण्यात आली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com