ज्यांना घडविले त्यांनीच साथ सोडली : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

गेली अनेक वर्षे पक्षाच्या खस्ता खाल्ल्या. अनेक कार्यकर्ते अन्‌ नेते घडविले. अनेक कार्यकर्ते चांगल्या पदावर पोहोचले; परंतु त्यांनी नंतर साथ सोडली. राजकारणात स्वार्थी वृत्ती वाढली आहे. सूडबुद्धीचे राजकारण होत आहे. राजकारणात अलीकडे गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पक्षाची बदनामी होते. पक्षातील नव्या लोकांना जुने कालबाह्य वाटतात; परंतु जुन्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचा विस्तार झाला. 

चाळीसगाव : खानदेशात धरणांसह सिंचन प्रकल्प आपल्या कालखंडात मंजूर झाले. तीच कामे आज सुरू आहेत. विकासाचे राजकारण केले, तरच लोक तुम्हाला निवडून देतात. राजकारणात स्वार्थीपणा वाढला आहे, अशी खंत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. 

पिंपरखेड तांडा (ता. चाळीसगाव) येथील आश्रमशाळेच्या आवारात भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वाडीलाल राठोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. खासदार ए. टी. पाटील, माजी मंत्री एम. के. पाटील, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, राजीव देशमुख, डॉ. बी. एस. पाटील, अनिल भाईदास पाटील (अमळनेर), जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, उदेसिंग (अण्णा) पवार, ज्ञानेश्वर माऊली, चित्रसेन पाटील, जी. जी. चव्हाण, पोपट भोळे, सभापती रवींद्र पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेश राठोड व्यासपीठावर होते.

गेली अनेक वर्षे पक्षाच्या खस्ता खाल्ल्या. अनेक कार्यकर्ते अन्‌ नेते घडविले. अनेक कार्यकर्ते चांगल्या पदावर पोहोचले; परंतु त्यांनी नंतर साथ सोडली. राजकारणात स्वार्थी वृत्ती वाढली आहे. सूडबुद्धीचे राजकारण होत आहे. राजकारणात अलीकडे गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पक्षाची बदनामी होते. पक्षातील नव्या लोकांना जुने कालबाह्य वाटतात; परंतु जुन्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचा विस्तार झाला. 

भाजपमध्ये इतरांपेक्षा वेगळे असावे, असे शिकविले जात असल्याचे सांगत आमदार खडसे यांनी आमदार उन्मेष पाटील यांचे नाव न घेता सांगितले, की निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले पाहिजे. बेलगंगा कारखान्याचा निवडणुकीसाठी वापर करण्यात आला. निवडून द्या, कारखाना सुरू करू, असे सांगितले. मात्र, निवडून आल्यानंतर कारखान्याचा विसर पडला, अशी टीका त्यांनी केली. जिल्हा बॅंकेचे संचालक राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. कवी मनोहर आंधळे यांनी केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Eknath Khadse talked about party workers