जामनेर नगरपालिकेत गिरीश महाजनांचे एकहाती वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जामनेर पालिका निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या साधना गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रा. अंजली पवार यांच्यात सरळ लढत होती. यात महाजन यांना 17हजार 893 मते मिळाली, तर प्रा. पवार यांना 9 हजार 540 मते मिळाली. 8 हजार 353 मतांनी भाजपच्या साधना महाजन विजयी झाल्या. तर नगरसेवक पदावर सर्व 24 भाजप उमेदवारच विजयी झाले आहेत.

जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर पालिकेत मोठे यश मिळवून आपले वर्चस्व सिध्द केले आहे. नगराध्यक्ष साधना महाजन यांच्यासह भाजपचे सर्व 24 उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी करूनही धुव्वा उडाला आहे. 

जामनेर पालिका निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या साधना गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रा. अंजली पवार यांच्यात सरळ लढत होती. यात महाजन यांना 17हजार 893 मते मिळाली, तर प्रा. पवार यांना 9 हजार 540 मते मिळाली. 8 हजार 353 मतांनी भाजपच्या साधना महाजन विजयी झाल्या. तर नगरसेवक पदावर सर्व 24 भाजप उमेदवारच विजयी झाले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करून भोपळाही फोडता आलेला नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक होते. 

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी आपल्या मतदार संघात प्रचाराची सर्व धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. भाजपतर्फे बाहेरचा कोणताही नेता त्यांच्या मतदार संघात  प्रचारासाठी आलेला नाही. पक्षातील अंतर्गत वाद पाहता मंत्री महाजन यांनी मिळविलेले एकतर्फी यश जिल्हयात पक्षाला उभारणी देणारे ठरणार आहे. शिवाय महाजन यांच्या नेतृत्वावरही आता शिक्कामोर्तब होणार आहे.

Web Title: BJP leader Girish Mahajan wins in Jamner municipal council