करवाढीचा सूत्रधार भाजपच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सातपूर - स्थायी समिती व महासभा डावलून एकटे महापालिका आयुक्त करवाढीचा निर्णय घेऊ शकत नाही. आयुक्त केवळ नामधारी असून, आयुक्तांचा रिमोट कंट्रोल भारतीय जनता पक्षाच्याच हाती आहे. शेतीसह इतर बारा प्रकारच्या करवाढीला महापालिकेतील मिलीजुली सरकार कारणीभूत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही करवाढ असून, यास जबाबदार असणाऱ्या महापौर, स्थायी समिती सभापतींसह आयुक्तांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. 

शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे बुधवारी (ता. १८) सौभाग्य लॉन्स येथे शेतकऱ्यांची बैठक झाली. कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष त्र्यंबक गायकवाड, दत्ता गायकवाड, सल्लागार उन्मेष गायधनी, आमदार सीमा हिरे, ‘सीटू’चे डॉ. डी. एल. कराड, शिवसेना मनपा गटनेते विलास शिंदे, आरपीआय गटनेत्या दीक्षा लोंढे, शिवाजी सहाणे, नगरसेवक शशिकांत जाधव, दिलीप दातीर, भागवत आरोटे, शशिकांत जाधव, सुधाकर बडगुजर, गजानन शेलार, रंजन ठाकरे, प्रभाग सभापती माधुरी बोलकर, नगरसेविका सीमा निगळ, मुरलीधर पाटील, नंदू जाधव, गोकुळ निगळ, दीपक मौले, गणेश बोलकर, तानाजी जायभावे, बाळा निगळ, प्रकाश निगळ, तुकाराम बदावणे आदी उपस्थित होते.

निवृती अरिंगळे म्हणाले, की महापालिका क्षेत्रात सर्व प्रकारच्या शेतजमिनी, खुले भूखंड, मैदाने, लॉन्स, हॉस्पिटल, हॉटेल, शाळा, वसतिगृह, पार्किंगची जागा आदी मिळकतींवर प्रचंड कर लादला आहे. याविरोधात स्थापन केलेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे सर्व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

महासभेत लक्षवेधी सूचना मांडल्याशिवाय कुठलाही ठराव होत नाही. आयुक्तांनी १२ प्रकारच्या करवाढी केल्या असून, त्या नाशिककरांवर लादल्या आहेत. पक्षविरहित एकमुखाने लढा देण्याची गरज आहे.
 - दिलीप दातीर, नगरसेवक

सत्ताधारी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आयुक्तांनी करवाढ केली आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही वाढ असून, यास जबाबदार असणाऱ्या महापौर, स्थायी समिती सभापतींसह आयुक्तांवर गुन्हे दाखल करावेत.
-  प्रकाश लोंढे, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष

आजची सभा कृती समितीची विशेष सभा वाटत नसून राजकीय पक्षांची सभा वाटत आहे. नाशिककरांच्या पाठीशी भाजप सरकार असून, नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही. २३ तारखेला नाशिककरांवर आंदोलन करण्याची वेळच येऊ देणार नाही. 
- सीमा हिरे, आमदार 

Web Title: BJP leader of tax hike