मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा !

धुळे  ः कोरोना संसर्गाचे नियंत्रण, वीजबिल माफी, शेतकऱ्यांना दिलासा देणे आदी विविध आघाड्यांवर राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. शिवाय मंत्र्यांवरील आरोप, पोलिस अधिकाऱ्यांचे कारनामे आदी विविध घटना, घडामोडींमुळे राज्याची बदनामी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्द्य़ावर राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपने शुक्रवारी राज्य शासनाचा निषेध करत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. 


ाराज्य शासनाचे विविध आघाड्यांवरील अपयश व काही घटनांमुळे होत असलेली राज्याची बदनामी असे विषय घेऊन भाजपने शुक्रवारी येथे राज्य शासनाचा निषेध केला. सकाळी अकरालाला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुशिष्य स्मारकासमोर राज्यातील आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, राज्य शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले. सरकारी दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांना विमानातून उतरायला लावण्याचा उर्मटपणा, विधान परिषदेच्या जागांना राज्यपाल मान्यता देत नाही, म्हणून विदर्भ- मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची निर्मिती अडवून ठेवणे, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी समर्पण निधी गोळा करण्याचीही कुचेष्टा करणे, कोरोनाचे कारण दाखवून शिवजयंतीवर निर्बंध घालणे, मद्यालयांना परवानगी, तर देवालये उघडण्यासाठी भक्तांना रस्त्यावर यायला लावणे, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली स्थगिती, सरकारच्या चुकांमुळे राज्यातील ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षित जागांबाबतची समस्या आदी विविध मुद्द्य़ांवर भाजपने राज्य शासनाचा निषेध केला.

शेतकऱ्यांना लुबाडले

राज्यातील अकार्यक्षम आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लुबाडले, वीजबिल माफी देतो, असे सरकारने सांगितले. आता मात्र सर्वसामान्य ग्राहकांचीही वीज तोडली जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मंत्र्यांना पाठीशी घातले गेले. आता वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेला सरकार पाठीशी घालत आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केली. राज्य शासनाने आपला कारभार सुधारावा, अन्यथा नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवून राज्यपालांकडे सरकार बरखास्तीची मागणी करूल असेही श्री. अग्रवाल म्हणाले. श्री. अग्रवाल यांच्यासह महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात, सभागृहनेते राजेश पवार, माजी महापौर जयश्री अहिरराव, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com