भाजप आमदार सुरेश भोळे अपघातात जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे अपघातात जखमी झाले. त्यांच्या छाती आणि डोक्याला मार लागला आहे.

जळगाव :  भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे अपघातात जखमी झाले. त्यांच्या छाती आणि डोक्याला मार लागला आहे.

शहरातील रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे खराब झाले असून, याचा फटका शाहराचे आमदार भोळे यांना बसला. भोळे रिंगरोडवरुन दुचाकीने जात असताना समोरून येणारे वाहन चुकविताना त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला पडले. यात त्यांच्या छातीला व डोक्याला मार लागला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Suresh Bhole injured in accident