PHOTOS : राहुल गांधी यांच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन...जोरदार घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

'रेप इन इंडिया' या आपल्या विधानावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी. या भाजपच्या मागणीवर दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेल्या भारत बचाव आंदोलनात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार देत भाजपवर निशाणा साधला माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही. मी मरण पत्करले पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. असे वक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला.

नाशिक : दिल्ली येथील भारत बचाव रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहर भाजप तर्फे एकात्मता चौकात जोडे मारो आंदोलन करत निदर्शने केले. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान राहूल गांधीनी केल्याचा आरोप 
'रेप इन इंडिया' या आपल्या विधानावरून राहुल गांधी माफी मागावी या भाजपच्या मागणी वर दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेल्या भारत बचाव आंदोलनात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार देत भाजपवर निशाणा साधला माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही. मी मरण पत्करले पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. असे वक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहर भाजपतर्फे भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, जिल्हा चिटनीस नारायण पवार, मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन दराडे, जेष्ठ नेते कांतिलाल लुनावत, उमाकांत राय, युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप नरवडे यांच्या नेतृत्वाखाली एकात्मता चौकात निदर्शने केले.

Image may contain: 2 people, people standing, people walking, crowd and outdoor

राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या फलकाला भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडे मारत आंदोलन केले. राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी किशोर नावरकर, एकनाथ बोडखे, नितीन परदेशी, सुनील पगारे, सचिन संघवी, सचिन लुनावत, आंनद बोथरा, प्रशांत जंगम, मनोज जंगम, विशाल छाजेड, स्वाती मुळे, मकरंद कुलकर्णी, आशिष चावरीया, शाम महाले, दीपक पगारे, बुऱ्हाण शेख, सचिन कांबळे, ताराचंद सोळसे आदी उपस्थित होते.

Image may contain: 11 people, people smiling, people standing

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP movement against Rahul Gandhi,s statement at Manmad Nashik Political Marathi News