Loksabha 2019 : जळगावमध्ये भाजपचा उमेदवार बदलणार?; उन्मेश पाटलांचे नाव पुढे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

जळगाव जिल्ह्यात स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत वाढत चाललेला विरोध भाजप नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. जळगावमध्ये वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यास पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेश पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. लवकरच भाजपची पक्षश्रेष्ठी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे नाव घोषित करणार आहेत. 

जळगाव जिल्ह्यात स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत वाढत चाललेला विरोध भाजप नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. जळगावमध्ये वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यास पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यासंदर्भात आमदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Web Title: BJP replace Jalgaon loksabha candidate now Unmesh Patil candidate