धुळ्यात फुलले भाजपचे कमळ; गोटेंना धक्का

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 10 डिसेंबर 2018

महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात समाजवादी पक्षाच्या बिनविरोध एका महिला उमेदवारासह 355 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी रविवारी सरासरी 59.64 टक्के मतदान झाले. भाजपचे 62, शिवसेनेचे 50, कॉंग्रेसचे 21, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 53, लोकसंग्राम पक्षाचे 59, "एमआयएम'चे 12, "रासप'चे 12, समाजवादी पक्षाचे 12, मनसेचा एक उमेदवार आणि इतर अपक्ष रिंगणात आहेत. 

धुळे : महापालिकेच्या येथील चुरशीच्या निवडणुकीत शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. यात विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. अद्याप विविध प्रभागांच्या सरासरी 8 ते 10 फेऱ्यांची मतमोजणी राहिली असल्याने निवडणूक यंत्रणेने दुपारी सव्वाबारापर्यंत एकही अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही. 

महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात समाजवादी पक्षाच्या बिनविरोध एका महिला उमेदवारासह 355 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी रविवारी सरासरी 59.64 टक्के मतदान झाले. भाजपचे 62, शिवसेनेचे 50, कॉंग्रेसचे 21, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 53, लोकसंग्राम पक्षाचे 59, "एमआयएम'चे 12, "रासप'चे 12, समाजवादी पक्षाचे 12, मनसेचा एक उमेदवार आणि इतर अपक्ष रिंगणात आहेत. 

शासकीय गोडाऊनमध्ये सकाळी दहानंतर मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. विविध प्रभागांच्या मिळून सरासरी 16 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. प्रथमच प्रभागातून चार उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे प्रभागांची व्याप्ती वाढली. त्याचा परिणाम मतमोजणी प्रक्रियेवर झाल्याचे दिसून येते. 

दुपारी सव्वाबारापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विविध प्रभागाच्या सरासरी 8 ते 10 फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक होती. मात्र, विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र होते. प्रभाग एकमधून भाजपच्या वंदना संजय भामरे, नरेंद्र चौधरी, प्रभाग पाचमध्ये शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील, भाजपचे भगवान गवळी, कृपेश नांद्रे, लोकसंग्राम पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार हेमा अनिल गोटे आदी उमेदवार आघाडीवर होते. 

Web Title: BJP takes mojority in Dhule Municipal Corporation