येवल्यातील दहापैकी आठ गणात कमळाचाच बोलबाला!

येवल्यातील दहापैकी आठ गणात कमळाचाच बोलबाला!

येवला : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा देत पुन्हा येवलेकरांनी २८ हजार १२० मतांची आघाडी भाजप-शिवसेना युतीच्या विजयी उमेदवार डॉ. भारती पवार यांना दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील १० गणांसह दहा गणातून तब्बल आठ गणात पवारांनाच मताधिक्य असून केवळ नगरसुल व सायगाव या गणात मात्र महाजनाना अल्पशी आघाडी मिळाली आहे. शहराने देखील आघाडीत बाजी मारल्याचे आकडे सांगतात.

भुजबळ राज्यात मंत्री असताना या बालेकिल्ल्यात कोणतीही निवडणूक, कोणतेही गाव असो नेहमीच राष्ट्रवादीला आघाडी मिळालेली पहायची सवय असलेल्या येथील जनतेने रिव्हर्स गिअर टाकल्याचे दिसते. यावेळी २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाचे मताधिक्य २४ हजार ८९३ मतांनी घटले आहे. तरी भुजबळांच्या घरात राष्ट्रवादीची पिछेहाट चिंताजनकच आहे.

तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पाटोदा गटातील पाटोदा व धुळगाव या गणातून ५ हजार २६ मतांचे विक्रमी मताधिक्य पवारांना मिळाले आहे. शिवसेना नेते संभाजी पवारांच्या सावरगाव गणातून २ हजार २२७ तर आमदार नरेंद्र दराडेचे वर्चस्व असलेल्या राजापूर मधून १ हजार ३४३ मतांची
आघाडी पवारांना मिळाली आहे.

माळी समाजाने तारले...

भुजबळ समर्थक माळी समाजामुळे महालेना नगरसूल गणातून १५३ व सायगाव गणातून ४७९ मताची आघाडी मिळाली आहे.अंदरसुल शहरात ५०५, नगरसूलमध्ये १ हजार ३५५,कोळगाव मधून १९० मतांची आघाडी मिळाली असून माळी समाज बांधवांचे वर्चस्व असलेल्या व मुस्लिम बहुल गावात राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे. तर अंदरसुल गणातून फक्त ३१५ तर राष्ट्रवादीच्या संघटनामुळे चिचोंडीतून फक्त ५३३ मतांची आघाडी पवारांना मिळाली आहे. येवला शहर संघाचा बालेकिल्ला असल्याने तब्बल अकरा हजारांहून अधिक मते भारती पवारांना मिळाली परंतु मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे हक्काचे मानले जाणारे मुस्लिम मतदार शहरात असल्याने केवळ १ हजार ८३७ मतांची आघाडी शहरातून पवारांना मिळाली आहे. 

असे मिळाले गणनिहाय मते...
गण   -  भारती पवार - धनराज महाले - आघाडी
पाटोदा  - ५४५१ - ३४०२ - २०४९
धुळगाव  - ६०८९ - ३११३ - २९७६  
सावरगाव - ५५०७- ३२८० - २२२७      
नगरसूल - ४२१६ - ४३६९ - १५३ (महाले)     
राजापूर - ४३५५ - ३४९३ - १३४३
सायगाव - ४१६८ - ४६४७ - ४७९ (महाले)
मुखेड -  ४८४३ - ४१३६ - ७०७ 
चिंचोडी - ५१३७ - ४२७० - ८६७       
अंदरसुल - ४४६८ - ४१५४ - ३१५ 
नागडे - ५०५० - ४४२८ - ६२२ 
येवला शहर - ११६८७ - ९८५० - १८३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com