शेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

शेंदुर्णी (ता जामनेर) : शेंदुर्णी नगरपंचायतीची पहिली निवडणूक रंगली असून यात भाजपच्या 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत राखले. पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्या उमेदवार विजयाताई खलसे यांना मिळाला. त्या 2 हजार 492 मतांनी विजयी झाल्या.

जलसंपदामंत्री व तालुक्याचे आमदार गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा निवडणूक लढवित असल्याने राज्याचे लक्ष धुळ्याबरोबरच जलसंपदामंत्र्यांच्या मतदारसंघातील शेंदुर्णीतही प्रकर्षाने आहे.

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून गरूड घराण्याची चौथी पीढीची क्षितिजा प्रविण गरूड या उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात गेल्या पाच वर्षापासून सरंपच पदावर असलेल्या भाजपच्या विजया अमृत खलसे होत्या. यात श्रीमती खलसे या 2 हजार 492 मतांनी विजयी झाल्या.

एकूणच नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार तर नगरसेवक पदाच्या 17 जागासाठी उमेदवार होते. भाजप 13, राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेसची केवळ 1 जागा मिळविता आली.

Web Title: BJP won in shendurni nagarpanchayat