'भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे. भाजपने ईव्हीमध्ये घोळ केला असून धुळे महापालिके निवडणुकांच्यावेळी लोकांना प्रचंड पैसे वाटले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

धुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे. भाजपने ईव्हीमध्ये घोळ केला असून धुळे महापालिके निवडणुकांच्यावेळी लोकांना प्रचंड पैसे वाटले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

धुळ्यात भाजपने सभांसाठी पैसे दिले, भाजपला मिळालेला हा विजय लोकांमुळे मिळाला नाहीतर हा ईव्हीएममुळे मिळालेला विजय आहे. लोकांचे मत लोकसंग्रामलाच होते मात्र ईव्हीएमचे मत भाजपला होते. ईव्हीएमच्या मर्जीनेच भाजपचा विजय झाला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, मी तीनवेळा निवडून आल्यानंतरही गिरीश महाजनांकडे निवडणुकीची सूत्रे भाजपने का दिला असा प्रश्न करत त्यांनी भाजपवर टीकेचा भडीमार केला. 30 वर्षे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांनाच पक्षात अभय दिले गेले. महाजनांसारखा खोटा आणि लबाड माणूस या जगात मी पाहिला नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

Web Title: BJP's victory is dangerous for Maharashtra