एव्हीएम मशिनमध्ये अंध बांधवांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

जुने नाशिक - महापालिका निवडणुकीत अंध मतदारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या एव्हीएम मशिनमध्ये अंध मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची विशेष सुविधा करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना मदतनिसावर अवलंबून राहावे लागणार आहे. 

मतदारांच्या सोयीसाठी प्रभागातील अ, ब, क, ड अशा गटांसाठी विविध रंगांच्या मतपत्रिकांचा वापर करून त्यावर उमेदवारांचे नाव, चिन्ह, अनुक्रमांक दिलेली मतपत्रिका एव्हीएमवर लावण्यात आली आहे. अंध मतदारांसाठी मात्र मशिनमध्ये कुठल्याही प्रकारची विशेष सुविधा करण्यात आली नाही. 

अंध मतदारांना मदतनीस घेण्याची परवानगी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना मदतनीसच नाही अशा बऱ्याच अंध मतदारांकडून मतदानाकडे पाठ फिरवण्याची शक्‍यता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने एव्हीएम मशिनवर ब्रेल लिपीचा वापर करण्यात आला होता, त्या पद्धतीचा महापालिका निवडणुकीत समावेश करणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Web Title: Blind brothers disadvantage in EVM Machine