Motivational : दृष्टि नाही..पण 'हा' २१ वेळा कळसूबाई शिखर चढला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सायकलिंग, बुद्धिबळ, गिरी भ्रमंती, ऍथलेटिक्‍ससारख्या क्रीडाप्रकारात अव्वल कामगिरी करत असलेल्या सागरने एक-दोन नव्हे, तर तब्बल २१ वेळा कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याचे जीवन अनेकांना प्रेरणादायी बनल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. 

नाशिक : समाजात अनेक धडधाकट तरुण नैराश्‍यामुळे आत्मविश्‍वास गमावून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशा परिस्थितीत दृष्टिबाधित सागर बोडके याने आत्मविश्‍वासाने एमएचे शिक्षण पूर्ण करत राज्यातील सर्वाधिक उंचीच्या कळसूबाई शिखरावर पाऊल ठेवत नवा विक्रम केला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुरुवारी (ता. 7) त्याचा गौरव केला. 

Image may contain: 2 people, people standing and phone

जागतिक विक्रम; जिल्हाधिकारी सूरज मांढरेंकडून गौरव 

सायकलिंग, बुद्धिबळ, गिरी भ्रमंती, ऍथलेटिक्‍ससारख्या क्रीडाप्रकारात अव्वल कामगिरी करत असलेल्या सागरने एक-दोन नव्हे, तर तब्बल 21 वेळा कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याचे जीवन अनेकांना प्रेरणादायी बनल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. 
गरुडझेप प्रतिष्ठानचा जागतिक विक्रमवीर दृष्टिबाधित सागर बोडकेला ब्रावो इंटरनॅशनलच्या फ्रान्स आवृत्तीने त्याला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. जिल्हाधिकारी मांढरे यांच्याकडून त्याने ते स्वीकारले. या वेळी गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जागतिक विक्रमवीर (५५० दिवस वाहतूक सुरक्षा अभियान राबविणारे) डॉ. संदीप भानोसे यांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी गौरव केला. डॉ. भानोसे यांनीही सागरचे अभिनंदन करत त्याचे नवीन ध्येय सायकलवर काश्‍मीर ते कन्याकुमारी पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याला संकेत भानोसे, दिनकर पाटील व माणिक निकम साथ देणार आहेत. 

स्वत:कडे काही कमी असेल तर रडत बसू नका...

धडधाकट माणसे अपयशाने खचून जाताना आपण पाहतो. पण अशा माणसांनी जिद्द चिकाटी आणि परिस्थितीवर मात केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करणे सहज शक्य असल्याचे सागर सांगतो. डोळे असूनही काहीही न करू शकणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा दृष्टीहिन सागरने दाखवून दिले आहे.भले भले लोकं त्यांच्याकडे असणाऱ्या कमतरतेविषयी दुख: व्यक्त करीत उर्वरित आयुष्य व्यतीत करताना दिसतात, पण आपल्याकडे काय कमी म्हणून रडत बसण्यापेक्षा काहीतरी करून दाखवावे ही जिद्द सागरने दाखवून दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blind Sagar Bodke climbed the Kalsubai mountain 21 times Nashik News