लग्नमंडपात वधू-वरांसह वऱ्हाडींनी केले रक्तदान

marraige
marraige

येवला - रक्तदान श्रेष्ठ दान आहे...म्हणूनच हा सामाजिक बांधिलकीचा विषय आहे. तालुक्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर चर्चेत असलेल्या चांदगाव येथील साळवे परिवाराने चक्क लग्नामध्येच रक्तदान शिबिर आयोजित करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे वऱ्हाडीसह वधू वरांनी देखील या सोहळ्यात रक्तदान केले. सोबतच सत्काराला फाटा देत घराघरांत संस्काराचे बीज रोवणाऱ्या हरिपाठाचे देखील वाटप करण्यात आले.

आजकाल लग्नसमारंभांमध्ये वाढता खर्च बघता सामाजिक समतोल बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. चिचोंडीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी लेकीचे झाड हा उपक्रम राबविला. त्यांनी विवाह झाला की लेकीच्या नावाने झाड लावण्याची प्रथा आपल्या गावात सुरु केली आहे. अनेकजण लग्नाच्या पत्रिकांमधून देखील पाणी बचत, लेक वाचवा, लेक शिकवा असे संदेश देत असतात. 

यापुढे जाऊन आता पंचायत समितीचे माजी सभापती जेष्ठ नेते साखरचंद साळवे यांच्या कुटुंबियांनी नातवाच्या लग्नसमारंभप्रसंगी मंगळवारी कृतीयुक्त बांधिलकी जपली आहे. पंचायत समितीच्या सभापती आशा साळवे, बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे यांचे पुतणे निखिल याचा विवाह चांदगाव मधील आण्णासाहेब राऊत यांनी कन्या माया हिच्याशी मंगळवारी सायंकाळी थाटामाटात झाला. राजकीय व इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला हजर होते.

लग्नामध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवून रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे प्रबोधन करू अशी कल्पना निखीलने घरच्यांसमोर मांडली. कुटुंबातील सर्वांनाच हा संकल्प आवडल्याने रक्तदान शिबिराने नियोजन पक्के झाले. मंगळवारी विवाहापूर्वी स्वतः नवरदेव निखील साळवे व त्याच्या वधू मायाने रक्तदान करून याचा शुभारंभ केला. आणि पाठोपाठ लग्नासाठी आलेल्या काही वऱ्हाडी मंडळीना हा उपक्रम आवडला अन ६३ जणांनी  रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी आलेल्या ब्लड बँकेच्या तंत्रज्ञानीही लग्नाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर हा उपक्रम आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगीतले. 

मी ब्लडबँक फिल्डमध्ये सात-आठ वर्षापासून काम करतेय. आम्ही खुप ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प केले आहे,चांगला प्रतिसाद मिळाला पण ही माझ्या आयुष्यातील पहिली वेळ आहे कि लग्नाच्या ठिकाणी आम्ही ब्ल्ड कँम्प आयोजित केला आहे. येथे लग्नामध्ये वधू वरांसह वऱ्हाडीनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे संजीवीनी ब्लडबँकच्या लॅब टेक्निशियन निलिमा सोरते यांनी सांगितले.

चार हजार हरिपाठाचेही केले वाटप...
लग्नसमारंभांमध्ये अतिथीगणासह वधू वरांकडील नातेवाईक,मान्यवरांचा सत्कार करण्याचे ' फॅड ' आज  समाजात मोठ्या प्रमाणावर रुजले आहे,की ज्याला लग्नाला जर वऱ्हाडी मंडळी असतात ते वैतागून मनातल्या मनात शिव्यांची लाखोलीही वाहतात.ह्याच सत्कार समारंभाला फाटा देत साळवे कुटुंबीयांनी ४ हजार हरिपाठाचे वाटप लग्नसमारंभाला आलेल्या पाहुन्याना वाटले.हरिपाठाचे दररोज जेणेकरून वाचन करावे हा धार्मिक उद्देश साळवे कुटुंबीयांनी लग्नाच्या निमित्ताने ठेवला होता.

“सामाजिक बांधिलकी बाळगत आम्ही सुरुवातीलाच अनिष्ट प्रथांना फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचा निश्चय केला होता.त्यानुसार माझ्या पुतण्याच्या लग्नात रक्तदान शिबिराचे आयोजन केले तसेच घरात संस्कारक्षम ठरणाऱ्या हरीपाठाचे वाटप करणार सत्कार सभारंभाला फाटा दिला.रक्तदानाच्या कार्यक्रमात नवरदेव नवरीनेही रक्तदान केले आहे.
-कांतीलाल साळवे,संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com