'इथल्या' नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह...परिसरात खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

नामपुर, सटाणा रस्त्यावरील वाघाडी नाल्यात पन्नास ते पंचावन्न वय असणा-या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले असून पोलिस याचा शोध घेत आहेत. 

नाशिक : ऐन दिवाळीच्या दिवशी नामपुर, सटाणा रस्त्यावरील वाघाडी नाल्यात पन्नास ते पंचावन्न वय असणा-या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले असून पोलिस याचा शोध घेत आहेत. 

महिलेची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसांपुढे आव्हान​ 

नामपुर सटाणा रस्त्यावरील वाघाडी नाल्यात एका पन्नास ते पंचावन्न वर्षीय महिलाचा मृतदेह आढळून आला आहे. निखिल मोरे यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात माहिती दिली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे घटनास्थळी दाखल झाले. अनोळखी महिलेने अंगावर लाल रंगाची साडी परिधान केली आहे. महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून कुत्र्यांनी मृतदेह ओढतोड केल्याचे दिसून आले आहे. जायखेडा पोलिसांनी परिसरातील गावात सदर महिलेची विचारपूस केली असता नाव व ओळख पटली नाही. कुणाला या महिलेच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळाल्यास ०२५५ - २३३४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरन पांढरे व उपनिरीक्षक स्वनिल कोळी यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of the woman was found to the area by tracing