संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानयानात बोराळे गावाला तिसरा क्रमांक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नांदगाव - तालुक्यातील बोराळे गावाला यंदाचा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत यंदाचा जिल्हास्तरीय तिसऱ्या क्रमांकाचा दोन लाखाचा पुरस्कार मिळाला. गिरणा काठावरील तालुक्यातील बोराळे गावाने यापूर्वी स्मार्ट गावाचा बहुमान मिळविला होता. अडीच हजाराची लोकसंख्या असलेल्या बोराळे गावात ग्रामस्थांना घरोघरी डस्टबिनचे वाटप करण्यात आले.

एवढ्याच न थांबता गावात ग्राम पंचायतीची घंटा गाडी फिरविण्यात येऊन कचरा संकलन करण्यात येते. गावातील सर्व गटारी भूमिगत करण्यात आल्याने सांडपाण्याचे व्यवस्थापन यशस्वी ठरले आहे. हागणदारी योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी झाल्याने गावातले शौचालय व्यवस्थापन देखील यशस्वी ठरले आहे. गावाच्या सरपंच सुनंदा मोरे, उपसरपंच राजेंद्र पवार, ग्रामसेवक राजेंद्र थोरात व त्यांच्या ग्राम पंचायत सदस्यांची टीमने गेल्या काही दिवसापासून विकासाभिमुखतेकडे वाटचाल सुरु केली आहे. व त्याला गावातील ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने स्मार्ट गावाच्या पुरस्काराचे नंतर आता संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. गावकर्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. 

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड प्रथम तर चांदवड तालुक्यातील राजदेहरे गावाला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. उत्तेजनार्थ गावामध्ये दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडीला वसंतराव नाईक पुरस्कार, देवळा तालुक्यातील सावकी गावाला आबासाहेब खेडकर पुरस्कार तर निफाड तालुक्यातील हनुमान नगरला बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे. 

Web Title: Borale village is third in Sant Gadge Baba Village Sanitation Campaign