गरम राखेच्या पोत्यात कोंबून फेकले अर्भक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

जळगाव : शहरातील समतानगरात आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना ताजी असताना, आज हरिविठ्ठलनगरात उकिरड्यावर पोत्यातील गरम राखेत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. दुपारी एकच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. रामानंदनगर पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगरातील नवनाथ चौकाजवळील उकिरड्यावर मुले कचरा वेचत असताना त्यांना गरम राखेने भरलेली पोती मिळून आली. त्यात खिळे-भंगार असावे म्हणून त्यांनी राख उकरताच अर्भक मिळून आल्याने या मुलांनी वस्तीच्या दिशेने धाव घेत, हा प्रकार सांगितला. परिसरातील महिलांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी केल्यावर पोलिसांना बोलाविले. उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, मनोज इंद्रेकर, योगेश पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेत, जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आनंद श्‍याम गोसावी यांनी माहिती दिल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. 

राखेत कोंबून पेटविण्याचा प्रयत्न 
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मिळून आलेले अर्भक पोत्यात गरम राख टाकून मधोमध ठेवण्यात आले. उकिरड्यावर ते पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पावसामुळे उकिरड्याचा कचरा ओला असल्याने पोती पेटली नाही. मात्र, गरम राखेमुळे आतील अर्भक भाजलेले होते. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याने किंवा मुलाच्या हव्यासापोटी "नकोशी'चा जीव घेतला असल्याबाबत परिसरातील महिलांमध्ये तर्कवितर्क लावले जात होते. 
 
"डीएनए' नमुने घेतले 
पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यावर शवविच्छेदनासाठी अर्भकास जिल्हा रुग्णालयात आणून तेथे मृत बाळाचे "डीएनए' नमुन्यासाठी मांडीचे हाड, रक्त व इतर नमुने संकलित करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: born baby murder crime