टँकरखाली दबून चिमुकल्याचा मृत्यू

रणधीर भामरे
गुरुवार, 6 जून 2019

वीरगाव : बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (ता. 6) घडली आहे. वटार (ता. बागलाण) येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मामाच्या शेतातून पिण्यासाठी पाणी वाहतूक करत असताना स्वमालकीच्या टँकरखाली दबून तालुक्यातील विरगाव येथील एका पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला आहे.

वीरगाव (ता. बागलाण) परिसरात सध्या पाणीबाणी झाली असताना घडलेली ही घटना तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी घेणारी ठरली आहे. विरगाव येथील हिरामण भिला गांगुर्डे यांचा नातू अक्षय नंदू गांगुर्डे (वय 11) हा आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या वडीलांसमवेत वटार येथे मामाच्या मळ्यात टँकर भरण्यासाठी गेला होता. यावेळी परत येत असताना अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडून याचे अपघाती निधन झाले. यामुळे बागलाण तालुक्यातील विरगाव गावावर शोककळा पसरली आहे. पाण्यासाठी अशा गंभीर पद्धतीने जीव गमावल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy dies in accident of Tanker