प्रियकराने प्रेयसीसह तिघींना जाळले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक : दिंडोरी रस्त्यावरील कालिकानगरमध्ये परप्रांतिय प्रियकराने आज पहाटेच्या सुमारास प्रेयसीसह तिची मुलगी व नातीवर ज्वलंतशिल पदार्थ टाकून पेटवून दिले. या घटनेमध्ये प्रेयसीची 9 महिन्यांच्या नातीचा होरपळून मृत्यु झाला तर मायलेकी गंभीररित्या भाजल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परप्रांतीय प्रियकर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
 
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता सुरेश देवरे (38, रा. कालिकानगर, दिंडोरी रोड, पंचवटी) यांचे परप्रांतिय जलील खान (रा. फुलेनगर, पंचवटी. मूळ रा. मथुरा, उत्तरप्रदेश) या आईस्क्रीम विक्रेत्याशी गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. संगीता देवरे हिच्याकडे तिची मुलगी व 9 महिन्याची नात भेटण्यासाठी आले होते. तर, रविवारी रात्री संगीता आणि तिचा प्रियकर जलिल यांच्यात अज्ञात कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून संशयित जलिल खान याने सोमवारी (ता.6) पहाटेच्या सुमारास घरात झोपलेल्या संगीता देवरे व तिची मुलगी-नात यांच्या अंगावर ज्वलंतशिल पदार्थ टाकून पेटवून दिले. या आगीमध्ये 9 महिन्यांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यु झाला तर संगीता व तिची मुलगी गंभीररित्या भाजल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीसांसह पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले. जखमी मायलेकींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे विशेष दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जाबजवाब नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संशयित जलिल खान पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Boyfriend burn the three along with his lover