वीटभट्टी व्यावसायिकांचे मंगळवारी मुंबईत धरणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नाशिक - अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या नेतृत्वाखाली राज्यातील वीट व्यावसायिक मुंबईत आझाद मैदानावर मंगळवारी (ता. 18) एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती नाशिकचे विभागीय संपर्कप्रमुख कचरू वैद्य यांनी दिली.

वीटभट्टी व्यावसायिकांकडून अकृषिक एनए व माती उत्खननावर 2010 पासून आकारलेल्या अनाठायी दंडाचे पैसे परत मिळावेत, राज्यातील सर्व तालुक्‍यांत समान वीटभट्टी धोरण राबवावे, कुंभार समाजाकडून बळजबरीने वसूल करण्यात येत असलेली दंडाची रक्कम त्वरित परत करावी, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र मातीकाम कलाकारी रुरल टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी धरणे धरण्यात येणार आहेत.

Web Title: bricks businessman agitation in- mumbai