संसाराचा डाव सुरू होण्यापूर्वीच मोडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

विवाहाच्या ब्रम्हगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. गेल्या तीन दिवसांपासून विवाहाचे सोपास्कर सुरू होते. धुळे शहरातील हिरे भवनात  वीस नोव्हेंबरला होणाऱ्या शाही विवाहाची संपूर्ण तयारी पूर्णत्वास आली होती. मात्र भामरे आणि बोरसे परिवारातील अमाप आनंदावर आज विरजण पडले. नियोजित वधूच्या अपघाती निधनानंतर दोन्ही परिवार आणि नातेवाईक सुन्न झाले.

कापडणे - विवाहाच्या ब्रम्हगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. गेल्या तीन दिवसांपासून विवाहाचे सोपास्कर सुरू होते. धुळे शहरातील हिरे भवनात  वीस नोव्हेंबरला होणाऱ्या शाही विवाहाची संपूर्ण तयारी पूर्णत्वास आली होती. मात्र भामरे आणि बोरसे परिवारातील अमाप आनंदावर आज विरजण पडले. नियोजित वधूच्या अपघाती निधनानंतर दोन्ही परिवार आणि नातेवाईक सुन्न झाले. येथील सारे भाऊबंद भामपूर येथे जात वाग्दत्त वधूच्या अंत्यसंस्कार यात्रेत सहभागी झालेत. तेव्हा मात्र साऱ्यांनीच हुंदके देत अश्रूंना वाट करून दिली.

येथील रहिवासी व विद्यावर्धिनी महाविद्यालयातील निवृत्त प्रा. एम. एल. पाटील यांचा मुलगा सचिन  भामरे-पाटील (एम.एस्सी, सेट, बीसीए, एम.एड.) याचा जुने भामपूर (ता. धुळे) येथील वैशाली मुरलीधर बोरसे (एम.ए. बीलीब) हिच्याशी वीस नोव्हेंबरला शहरातील हिरे भवनमध्ये विवाह पार पाडणार होता. त्यासाठी भामरे व बोरसे परिवाराची सर्व तयारी पूर्णत्वास आली होती. वैशाली शिरपूर येथे भावासोबत किरकोळ खरेदीसाठी मोटारसायकलवर जाताना अपघातात ठार झाली. यावेळी प्रा. पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पाटील येथे भाऊबंदकीत पत्रिकाच वाटप करीत होते. त्याचवेळी भावी सुनेच्या अपघात अन पाठोपाठ निधनाचे वृत्त समजले अन दोघांनीही हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी केली. येथील साऱ्यांनीच रुग्णालयात धाव घेतली.

भामरे परिवारही सुन्न
प्रा. पाटील (भामरे) यांच्या कुटुंबातील हा शाही विवाह होता. गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक सोहळे सुरू होती. काल (ता. १६) भाऊबंदकीला पंगतही दिली. वऱ्हाडींकडून कोणताही आहेर न घेण्याचे ठरविलेले होते.

बिदाईऐवजी निघाली अंत्ययात्रा
भामपूर येथील पाटील कुटुंबातील वैशाली ही शेवटची लेक होती. त्यांनीही सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र अचानक कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरने पूर्ण भामपूरवरच शोककळा पसरली. ज्या घरातून वधूची ’बारात’ निघणार होती. तेथूनच अंत्ययात्रा निघाल्याने आईवडील, भाऊ, बहीण व दोन दिवसांपासून दाखल करवल्यांनी हंबरडा फोडला. शोक अनावर झाला. भामपूरवाशियांची आज रात्रीची चूल पेटविलीच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride death in accident