कर्नाटक निवडणुकांमुळे कोंबड्या खाताहेत भाव

broiler-hen
broiler-hen

नाशिक - कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या ब्रॉयलर कुक्कुटपालन उद्योगाला काहीसा दिलासा मिळाला. महाराष्ट्रात 62 रुपये किलो भावाने कोंबड्या विकल्या जात असताना कर्नाटकमध्ये 72 रुपये किलो भाव मिळतोय. उष्णतेच्या तडाख्याने उत्पादन कमी होत चालेल्या राजस्थानमध्ये कर्नाटकइतक्‍या भावाने कोंबड्या विकल्या जाताहेत.

उन्हाळ्यामध्ये ब्रॉयलर कोंबड्या उत्पादन कमी व्हायचे आणि एप्रिल-मेमध्ये भाव वाढायचे, असा अनुभव गेल्यावर्षीपर्यंत उत्पादकांना होता. यंदा मात्र परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांनी कोंबड्यांना पसंती दिली नाही. त्यातच मध्यंतरी झालेल्या आंदोलनामुळे राज्यात सहा हजार टन कोंबड्या फार्ममध्ये शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे किलोला 67 रुपये हा उत्पादन खर्च येत असताना विक्री 62 रुपयांना करावी लागते. आता मात्र शाळांना सुट्या लागल्या असून, लग्नसराई सुरू झाली असल्याने येत्या आठवडाभरात शिलकीसह कोंबड्यांची विक्री होईल आणि भाववाढीला चालना मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे.
फार्ममधील कोंबड्या उष्णतेच्या धगीमुळे दिवसा खाद्य खात नाहीत.

त्यामुळे एरव्हीच्या तुलनेत कोंबड्यांच्या वजनात 25 टक्‍क्‍यांनी घट होऊ लागली आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून उत्पादकांचा दिवसाचा कोंबडीमागे दोन रुपयांनी खर्च वाढला आहे. त्यातच पाण्याच्या उपलब्धतेअभावी कोंबड्यांचे उत्पादन काही उत्पादकांनी बंद केले असून, सिन्नर, मालेगाव, चांदवड अशा भागामध्ये उत्पादकांना कोंबड्यांना पाणी देण्यासाठी टॅंकर विकत घ्यावे लागताहेत.

ब्रॉयलर कोंबड्यांचा भाव (किलोला रुपयांमध्ये)
- गुजरात - 68
- कर्नाटक सीमेवर - 65
- मध्य प्रदेश - 67 ते 68
- मुंबई - 62

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com