सख्खा भाऊ..पक्का वैरी..काय केले हे भावाने..

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन मोठ्या भावाने लहान भावावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. पाटीलनगर येथील कोठारी बंधू चौकातील सुयश बाळासाहेब जाधव (31) याने लहान भाऊ हृषीकेश (29) याला तू दारू पिऊन का आलास व घरात उशिरा का येतोस? अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले

नाशिक : किरकोळ कारणावरून मोठ्या भावावर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोठ्या भावाला नाशिक पोलिसानी अटक केली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या लहान भावाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Image may contain: 2 people, outdoor

पाटीलनगरला भावंडांमध्ये हाणामारी 
पाटीलनगर येथे किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन मोठ्या भावाने लहान भावावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. पाटीलनगर येथील कोठारी बंधू चौकातील सुयश बाळासाहेब जाधव (31) याने लहान भाऊ हृषीकेश (29) याला तू दारू पिऊन का आलास व घरात उशिरा का येतोस? अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी सुयशने रागाच्या भरात धारदार शस्त्राने हृषीकेशच्या मानेवर वार करून त्यास जखमी केले. दरम्यान, हृषीकेश यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, सुयशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother killed brother at Nashik Marathi News