बी.एस्सी.(कृषी)ची सोमवारी गुणवत्ता यादी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नाशिक - बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता जाहीर केलेल्या प्रारूप गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविण्याची मुदत मंगळवारी (ता. 17) संपली. प्राप्त हरकतींचा निपटारा करत संबंधित प्राधिकरणाकडून सोमवारी (ता. 23) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीनुसार पुढील प्रवेश प्रक्रिया पार पडेल.

प्रारूप गुणवत्ता यादी, तसेच कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीसह प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांपैकी रद्द ठरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती. रद्द ठरविण्यात आलेल्या उमेदवारांत सर्वाधिक उमेदवार डुप्लिकेट अर्ज सादर करणारे होते. याशिवाय गुणांची अर्हता पूर्ण न करणे, आरक्षणासंबंधी तांत्रिक चूक व अन्य कारणांमुळे रद्द ठरविलेल्या यादीत विद्यार्थ्यांची नावे होती.

Web Title: B.Sc. Agriculture Merit List education