सातपूर दुर्घटनाप्रकरणी बिल्डरला जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

ध्रुवनगर (सातपूर) येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक - ध्रुवनगर (सातपूर) येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे. येत्या 7 ऑगस्टपर्यंत त्यांना अटी-शर्तीन्वये अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. नाशिक जिल्हा न्यायालयाने गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

"अपना घर' या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी मजुरांसाठी बांधलेली 30 हजार लिटर पाण्याची टाकी 2 जुलैला सकाळी फुटली. या दुर्घटनेत एका महिला व तीन मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुजॉय गुप्ता यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यामुळे गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी, गुप्ता यांना सात ऑगस्टपर्यंत अटी-शर्तीन्वये अंतरिम जामीन मंजूर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Builder Bell in Satpur Accident Court