जळगावात प्रथमच ‘पांढऱ्या भुवईच्या बुलबुल’चे आगमन

Bulbul
Bulbul

जळगाव - शहर परिसरात एरवी ‘लाल बुड्या बुलबुल’ पक्षी नेहमीच आढळून येतो. मात्र, पांढऱ्या भुवईचा बुलबुल जळगाव शहरातील निमखेडी परिसरात प्रथमच बघायला मिळाला आहे. तर ममुराबाद परिसरात लाल डोक्‍याचा सणस सात वर्षांनंतर दिसून आला आहे. 

पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी यासंदर्भात माहिती दिली. लाल बुड्या बुलबुल (Red-vented Bulbul) सर्वत्र आणि बारा महिने मोठ्या संख्येने आढळतात. पण बुलबुल कुळातील ‘पांढऱ्या भुवईचा बुलबुल’ आपल्याकडे दुर्मिळ आहे. जळगाव परिसरात प्रथमच या पक्षाचे दर्शन झाले. 

असा आहे हा बुलबुल 
पांढऱ्या भुवईच्या बुलबुलला इंग्रजीत White-browed Bulbul असे संबोधले जाते. तर त्याचे शास्त्रीय नाव Pyconotus luteolus हे आहे. ही जात दक्षिण भारतात व प्रामुख्याने पश्‍चिम घाटात आढळून येते. ही जात ‘खर बुलबुल’ किंवा ‘सितभ्रू बुलबुल’ या नावानं देखील ओळखली जाते. त्याचा रंग फिकट ओलिव्ह हिरवा असून त्याला पांढरी भुवई असते. वड-पिंपळाची फळ, मध मुख्य अन्न असून वृक्षबीज प्रसाराच्या कामात मोलाचा वाटा असतो.

लाल डोक्‍याचा ससाणा
लाल डोक्‍याचा ससाणा/ तुरमती यास इंग्रजीत  Red-headed Falcon किंवा Red-necked Falcon- असे म्हटले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Falco chicquera  असे आहे. ससाणा कुटुंबातील ही शिकारी जात. याचा भाऊबंध आफ्रिकेत आढळतो. भारतात ही जात विखुरलेली आणि दुर्मिळ आहे.

२०११ च्या नोव्हेंबरमध्ये याची ममुराबाद परिसरात नोंद घेतली होती. याची मादी ‘तुरमती’ या नावाने आणि नर हा ‘चटवा’ या नावाने ओळखला जातो. नर मादी दिसायला सारखे असून मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. याचा रंग फिकट निळसर करडा असून अंतर भागावर आडव्या आऱ्या असतात. हुकसारखी अणकुचीदार चोच असते. डोके आणि मान तपकिरी लाल असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com