डॉ. धीरज जमादार यांची नैराश्यातून आत्महत्या

संजय सोनोने
मंगळवार, 20 मार्च 2018

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव तालुक्यातील भोनगांव या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर धीरज प्रकाश जमादार यांनी आज (मंगळवार) सकाळी आपल्या शेगाव येथील खामगाव रोडवरील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सोमवारी एका रुग्णासोबत वाद झाला आणि त्या वादात रुग्णाने केलेला दुर्व्यवहार जिव्हारी लागल्याने नैराश्यातून आपले जीवन संपविल्याचे स्पष्ट झाले आहे.

आत्महत्येपूर्वी डॉक्टर धीरज यांनी आपल्या मित्राला मोबाईलवरून मेसेज करून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय आत्महत्या पूर्वी चिठ्ठी ही लिहिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. डॉक्टर धीरज यांचे सात महिन्यांपूर्वी लग्न झाले होते, त्यांची पत्नी सध्या मध्यप्रदेश येथील होशंगाबाद येथे माहेरी गेलेली होती. यादरम्यान आज सकाळी धीरज यांनी आपल्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. सोमवारी एका रुग्णासोबत वाद झाला आणि त्या वादात रुग्णाने केलेला दुर्व्यवहार डॉक्टराच्या जिव्हारी लागल्याने नैराश्यातून आपले जीवन संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.

Web Title: buldhana news shegaon dr dhiraj jamadar suicide