बुलेट ट्रेनला पैसे, पीकविम्याला नाही- राजू शेट्टीं

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

नांदगाव ः बुलेट ट्रेन आणायला शासनाकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे द्यायला नाहीत. कारण सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. चांदोरा येथील जनावरांच्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी श्री. शेट्टी बोलत होते.

श्री. शेट्टी म्हणाले, की समृद्धी महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करायला पैसे आहे, पण शेतकरी व जनावरांच्या पाण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सलग दोन वर्षे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. पण या राज्यकर्त्यांना याची काहीही जाणीव नाही. या दुष्काळाच्या काळामध्ये पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्याला पीकविम्यापासून वंचित ठेवले जात आहे. मात्र शेतकऱ्यांचा सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
आमदार पंकज भुजबळ यांनी चांदोरा चारा छावणीतील 2 हजार जनावरे दत्तक घेतल्याबद्दल शेट्टी यांनी त्यांचे कौतुक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullet train gets money, not for crop insurance- Raju Shetty