बसचे ब्रेक निकामी होतात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

म्हसरूळ - पंचवटी कारंजा येथील म्हसोबा मंदिरासमोर शहर बसचे ब्रेक निकामी झाले असताना चालकाने प्रसंगावधान दाखवून दुभाजकावर बस नेल्याने मोठी दुर्घटना टळली.

पेठ रोड, जुना जकात नाका येथून केटीएचएम महाविद्यालयाकडे निघालेली शहर बस (एमएच १५ ऐके ८०४०) गुरुवारी (ता. ६) पंचवटी कारंजाकडे येत होती.

सकाळी दहाला पंचवटीतील म्हसोबा मंदिराजवळ ही बस आली असताना अचानक तिचे ब्रेक निकामी झाले. त्या वेळी बसमध्ये जवळपास पंचवीस प्रवासी होते. चालक व्ही. जी. साळवे यांनी प्रसंगावधान दाखवत बस दुभाजकावर नेऊन आदळली. बसचे व दुभाजकाचे किरकोळ नुकसान झाले. बसचालकाच्या या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली असून, कुणालाही दुखापत झाली नाही.

हा परिसर वर्दळीचा आहे. जवळच शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी असते. बसचा वेग कमी होता. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाने युक्ती लढवत ती दुभाजकावर नेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
- गणेश जाधव, प्रत्यक्षदर्शी

घडलेली घटना वरिष्ठांना कळविली असून, बसचे जवळपास सहा ते सात हजारांचे नुकसान झाले आहे. दुभाजकाची जाळी तुटली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी बसची तपासणी सुरू आहे. 
- शुभांगी शिरसाठ, आगार व्यवस्थापक, पंचवटी

Web Title: Bus Break Fail Driver