"एसटी'ची बस आगारे प्रवाशांसाठी असुरक्षित 

रईस शेख
Monday, 18 November 2019

जळगाव : शहरासह जिल्ह्यात पंधरा तालुक्‍यांत महामंडळाचे बसस्थानके मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. त्यापैकी अकरा ठिकाणी आगार असून प्रत्येक आगारात महामंडळातर्फे सिसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत आहे. मात्र, योग्य नियोजन आणि देखाभालीअभावी यंत्रणा कुचकामी ठरु लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर बसस्थानकांची सुरक्षा पूर्णत: "रामभरोसे' असल्याची स्थिती आहे. बहुतांश बसस्थानके सरक्षक भिंतीशिवाय आहेत. पोलिसांना "फिक्‍स पॉईंट ड्युटी' असताना ते बसस्थानकावर फिरकतही नाहीत. 

जळगाव : शहरासह जिल्ह्यात पंधरा तालुक्‍यांत महामंडळाचे बसस्थानके मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. त्यापैकी अकरा ठिकाणी आगार असून प्रत्येक आगारात महामंडळातर्फे सिसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत आहे. मात्र, योग्य नियोजन आणि देखाभालीअभावी यंत्रणा कुचकामी ठरु लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर बसस्थानकांची सुरक्षा पूर्णत: "रामभरोसे' असल्याची स्थिती आहे. बहुतांश बसस्थानके सरक्षक भिंतीशिवाय आहेत. पोलिसांना "फिक्‍स पॉईंट ड्युटी' असताना ते बसस्थानकावर फिरकतही नाहीत. 

अभिमन्यू फत्रू बडगुजर (वय-71, रा.यावल) पत्नी रत्नाबाई सोबत नाशिकला जाण्यासाठी 27 ऑक्‍टोबरला सकाळी 7 वाजता यावल बस्थानकावर आले. यावल-कल्याण बसमधून ते प्रवासाला निघाले असताना यावल ते अडावददरम्यान त्यांच्या बॅगमधील साडेचार लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने चार भामट्यांनी लंपास केले. यावल पोलिसांत दाखल या गुन्ह्यात गुन्हेशाखेच्या तांत्रिक पथकाने पुरावे संकलनास सुरवात केली. यावल बस स्थानकावरुन लगेच दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या फुटेजमधून काही तांत्रिक त्रुटी समोर आल्यामुळे पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत नाही. त्यामुळे बसस्थानक, आगारांतील सीसीटीव्ही यंत्रणा कितपत सज्ज आहे, याचा "सकाळ'ने आढावा घेतला. 

Image may contain: one or more people

सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा सज्ज नाही 
जळगाव आगारातच सिसीटीव्ही कॅमेरे नावापुरते लावले आहेत. कॅमेरे टिव्हीला जोडलेले असले तरी रेकॉर्डींग साठवणारे "डीव्हीआर' यंत्रच नाही. विभागीय नियंत्रकाचे कार्यालय व जिल्ह्याच्या मुख्य आगाराची ही अवस्था आहे, तर इतर बसस्थानकांची कल्पनाच न केलेली बरी. आगारात प्रत्येक तिसऱ्या दिवसात एक गुन्हा घडतो. पोलिसांसाठी चौक्‍यादेखील आहेत. मात्र, पोलिस कधीतरी येतात व निघून जातात. हजेरी पटावर मात्र दिवसातून चार पोलिस बसस्थानकावर नियुक्तीला दाखवले जातात. 

No photo description available.

फुटेजमध्ये दिवसाची "रात्र' 
रविवारी सकाळी 7 वाजता अभिमन्यू बडगुजर व त्यांची पत्नी यावल बसस्थानकावर पोचले. सव्वाआठ वाजेनंतर यावल-कल्याण बसने निघाले होते. असे असताना बसस्थानकातून तांत्रिक गुन्हे तपास पथकाने मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरुवारी 24ला रात्री 9 वाजून 2 मिनिटांची वेळ दाखवते. चुकीच्या वेळेमुळे "डम्पडाटा' व तांत्रिक पुरावे संकलनासाठी पथकाला प्रचंड अडचणींचा सामना करवा लागत आहे. हीच परिस्थीती इतर ठिकाणची आहे. 
 
जळगाव अंतर्गत 11 बस आगार आहेत, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून सर्वच्या सर्व सुस्थितीत कार्य करीत आहे. या कॅमेरांच्या रखरखावची जबाबदारी मुंबईच्या खासगी ठेकेदाराला सोपवलेली आहे. 
- राजेंद्र देवरे आगार नियंत्रक 

तपासाची दिशाच बिघडते 
केवळ रेल्वेची सीसीटीव्ही यंत्रणा अद्यावत असून इतर ठिकाणी नावापुरते कॅमेरे लावून ठेवल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तांत्रिकपुरावे गोळा करतांना सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यावर त्याचे बारीक अध्ययन केले जाते, फुटेज नुसार "डम्पडाटा' इतर आवश्‍यक पुरावे संकलीत करण्यासाठी दिशा मिळते. मात्र, बॅंका, सिव्हील हॉस्पीटल, आणि बसस्थानक या सर्वजनीक ठिकाणी नुसतेच बंद कॅमेरे असतात, कॅमेरे सुुरु असले तरी त्यांचा मेंटन्स ठेवत नसल्याचा वाईट अनुभव तपासात येतो. 
- बापू रोहोम वरिष्ठ निरीक्षक, गुन्हेशाखा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus station jalgaon cctv camera police