नाशिक - दूध व्यावसाय़िकाकडून स्वच्छता निरिक्षकास मारहाण

जयेश सुर्यवंशी
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिक : गेल्या आठवड्यात शिवसेना पदाधिकारी आणि दुध व्यावसायिक बाळासाहेब शेलार यांच्याकडून प्रभाग १७ मधील स्वच्छता निरिक्षक प्रभाकर थोरात यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी जेलरोड परिसरातील स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना जेल रोड परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली.

या घटनेत भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गुढीपाड्व्यापासून राज्यात प्लास्टिकबंदी करण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक मनपा सुरक्षा निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

जेलरोड परिसरातील दुध व्यावसायिक नितीन अरिंगळे प्लास्टिक कॅरीबॅग वापरून दुध वाटत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक भोसले यांनी याबाबत समज दिली. मात्र अरेरावी करत अरिंगळे यांनी ज्ञानेश्वर भोसले यांना मारहाण केली.

मारहाणीत जखमी झालेले स्वच्छता निरीक्षक भोसले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: businessman beats cleaner