सीए अभ्यासक्रमाचा पेपर ऐनवेळी रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया संस्थेतर्फे शनिवारी (ता. 9) फाउंडेशन पेपर 1, फायनल पेपर 5, आयआरएम पेपर 1, आयएनटीटी एटी आणि डीआयएसए ईटी या विषयांची लेखी परीक्षा होती. मात्र देशातील अनेक शहरांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असल्याची माहिती माध्यमांतून मिळाल्याचे स्पष्ट करत, पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांच्या पेपरसाठीची सुधारित तारीख लवकरच कळविली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे

नाशिक : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया यांच्यातर्फे सध्या देशभरातील परीक्षा केंद्रांवर सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमासंदर्भातील लेखी परीक्षा सुरू आहे. शनिवारी (ता. 9) नियोजित असलेला पेपर ऐनवेळी रद्द करण्याची सूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली. अयोध्या निकालासंदर्भात देशातील अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद असल्याच्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेतला असल्याचे समजते. 

अयोध्या निकाल पार्श्वभूमीवर नियोजित पेपर ऐनवेळी रद्द

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया संस्थेतर्फे शनिवारी (ता. 9) फाउंडेशन पेपर 1, फायनल पेपर 5, आयआरएम पेपर 1, आयएनटीटी एटी आणि डीआयएसए ईटी या विषयांची लेखी परीक्षा होती. मात्र देशातील अनेक शहरांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असल्याची माहिती माध्यमांतून मिळाल्याचे स्पष्ट करत, पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांच्या पेपरसाठीची सुधारित तारीख लवकरच कळविली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये नियोजित परीक्षा रद्द झाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर संस्थेने स्पष्टीकरण देताना, नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CA Course Paper canceled at time Nashik News