अन् त्याने केली वासराची शिकार...

veal-calf-406-1.jpg
veal-calf-406-1.jpg

नाशिक : गिरणारे येथील वडगाव रस्त्यावरील पार्वतीराजनगर येथे शुक्रवारी (ता. 17) रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना घडली. मोतीराम थेटे यांच्या बंगल्याच्या वाड्यात वासरू बांधलेले असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले. पार्वतीराजनगर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माणगेले अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. परिसरात लहान मुले असून, ते खेळत असताना त्यांच्यालर हल्ला झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उभा राहिला आहे.

असा घडला प्रकार

पार्वतीराजनगर येथे शुक्रवारी (ता. 17) रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना घडली. मोतीराम थेटे यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या वाड्यात दोन गायी व दोन वासरू नेहमीप्रमाणे दावणीला बांधलेले होते. थेटे कुटुंबीय गुरुवारी बाहेर गेले असताना, ते घरी परतल्यावर त्यांना वासरू अर्धवट खाल्ल्याचे लक्षात येताच बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्रीची वेळी असल्याने त्यांनी त्या वासराची दोरी सोडून त्यावर कपडा टाकला. परंतु नंतर पुन्हा घरातील सर्व झोपले असता, वासरू घरापासून पंधरा ते वीस फूट लांब ओरबाडून नेल्याचे आढळून आले. ही घटना संपूर्ण गावात समजताच परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष 

परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर आहे, हे प्रशासनाला माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आज वासरावर हल्ला केला, नंतर कोणी रात्रीच्या वेळी बाहेरून येणारे असतील त्यांच्यावर हल्ला केल्यास याला जबाबदार कोण राहणार? यासाठी लवकरात लवकर ही घटना लक्षात घेऊन ठोस पावले उचलावी. 
भाऊसाहेब थेटे (ग्रामस्थ) 


आम्ही घरी नसताना आमच्या वासरावर हल्ला झाला. मात्र, जर हा हल्ला दुसऱ्या कोणावर झाला असता तर याला कोण जबाबदार राहिले असते. वारंवार प्रशासनाला व वन विभागाला कळवूनसुद्धा ते ऐकत नाहीत. यासाठी लवकर परिसरात पिंजरा लावणे गरजेचे आहे. 
विष्णू थेटे (ग्रामस्थ)  
हेही वाचा>लग्नापुर्वीच वधू- वरांची याला पसंती... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com