टोलनाका टाळण्यासाठी वाहनचालकांची क्‍लृप्ती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

कापडणे - मुंबई-आग्रा महामार्गावर सरवड (ता. धुळे) शिवारात टोलनाका आहे. या टोलनाक्‍यापासून अवघ्या 30 किलोमीटरवर शिरपूरजवळ दुसरा टोलनाका आहे. या दोन्ही टोलनाक्‍यांचे वाहनानुसार दर अधिक आहेत. त्यामुळे टोलनाका वाचविण्यासाठी वाहनधारकांकडून विविध क्‍लृप्त्या वापरल्या जात आहेत. काही वाहनधारक शेतशिवारातील रस्त्यांचा वापर करून टोलनाके टाळत आहेत. यात शेतशिवारातील रस्त्यांची मात्र वाट लागत आहे. 

धुळे ते शिरपूर दरम्यान सरवड (ता. धुळे) व शिरपूर शहराजवळ अवघ्या 30 किलोमीटर अंतरात दोन टोलनाके आहेत. याशिवाय मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या व पुढे शिरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना लळिंगजवळील टोलनाक्‍यावरही पैसे द्यावे लागतात. यामुळे वाहनधारकांना अधिकचा भुर्दंड बसत आहेत. यामुळे अनेक वाहनधारक शिरपूरसह सरवड शिवारातील टोलनाके टाळण्यासाठी अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करतात. यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. काही वाहनधारक थेट शेतशिवारातील रस्त्यांचा वापर करतात. यात सरवड फाट्यापासून कापडणे शिवारातून जाणाऱ्या सोनगीर रस्त्याचा अधिक वापर होतो. यामुळे या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे. सरवड फाटा ते धनूरदरम्यान रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. कापडणे शिवारात मात्र हा रस्ता कच्चा आहे. कापडणे चौफुलीपासून सोनगीर रस्ता आहे. तो थेट टोलनाक्‍याच्या पुढे निघतो. यासाठी सहा किलोमीटरचा वळसा पडतो. मात्र, वाहनधारकांचे किमान शंभर ते पाचशे रुपये वाचतात. यामुळे या रस्त्याने मोठ्या संख्येने वाहनधारक मार्गस्थ होतात. यामुळे गेल्या तीन- चार वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, शेतशिवारातील रस्त्याने जाणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी दिनेश बडगुजर, गणेश बोरसे, बबलू बाळदेकर, लोटन पाटील, रमेश पाटील, एम. डी. पाटील, सज्जाक पिंजारी आदींनी केली. 

Web Title: Camouflage for vehicle drivers to avoid the toll naka